मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विनायक शिंदे या निलंबित पोलीस शिपायाच्या कळवा येथील घरातून एटीएसने एक प्रिंटर हस्तगत केला आहे. या प्रिंटरचे कनेक्शन मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाशी असल्याची माहिती समोर येत आहे.
‘ते’ धमकी पत्र ‘त्या’ प्रिंटरमधून काढले?
एटीएसच्या पथकाने अटकेत असलेल्या निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे याच्या ठाणे-कळवा येथील घराची सोमवारी, २२ मार्च रोजी झडती घेतली होती. या झडतीत एटीएसला एक प्रिंटर मिळाला आहे. या प्रिंटरचे कनेक्शन मुकेश अंबानी प्रकरणाशी असल्याचा दाट संशय एटीएसला आहे. अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना उद्देशून लिहिण्यात आलेली एक धमकीचे पत्र तपास यंत्रणेच्या हाती लागले होते. त्या पत्रात प्रिंट शिंदे यांच्या घरात जप्त केलेल्या प्रिंटरमधून काढण्यात आल्याची शक्यता आहे. याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा प्रिंटर मुकेश अंबानी यांच्या प्रकरणाशी संबंधित असेल, म्हणून विनायक शिंदे याचा या कटात सहभाग असल्याची शक्यता आहे.
(हेही वाचा : फडणवीस म्हणाले, पवारांना दिली चुकीची माहिती! देशमुख क्वारंटाईन नव्हते तर…)
विनायक शिंदे हा सचिन वाझेच्या जवळचा!
रिलायन्स कंपनीचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो सापडली होती. त्यात जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या, तसेच अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र दिले होते. त्यात डिव्हाइस नव्हता. या पत्रात असे म्हटले होते कि, आता फक्त साहित्य आणले होते, परतच्या वेळी ते जोडले जाईल’, असे यात म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास यंत्रणा लागलीच कामाला लागल्या. त्यावेळी याची जबाबदारी ‘जैश-उल हिंद’ या संघटनेने घेतल्याचे समोर आले होते. परंतु आता अधिक खोलात तपास करताच या प्रकरणाचा संबंध सचिन वाझे याच्याशी आला आहे. ज्याच्याकडे तो प्रिंटर सापडला आहे, तो विनायक शिंदे हा वाझेच्या जवळचा होता.
Join Our WhatsApp Community