उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण (Ladki Bahini Yojana) मुद्द्यावर ही भाष्य केलं. विरोधकांना प्रत्त्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “लाडकी बहीण यांच्या मनातून काही जात नाही. लाडकी बहीण आमची झाली आहे. त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात. लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद करणार नाही.” असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.
“लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही (Economy) चालना देणारी योजना आहे. या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो. १५०० रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. महिला सक्षमीकरणाचे एक मोठ पाऊल सरकारने उचलले.”
हेही वाचा-मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण !
“परवाच विधान परिषदेत गटनेते प्रविण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली. लाडकी बहिण योजनेच अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँकेत १० ते २५ हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत. मी या सर्वांना आवाहन करणार आहे. ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा.” (Ajit Pawar)
हेही वाचा-दहशतवादाविरोधात India-U.S येणार एकत्र
“लाडकी बहीण योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू. कारण, हा थोडाथडका पैसा नाही. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे, मोठे योगदान मिळेल.” असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community