विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांच्यानंतर कोण काम करणार, यावर स्पष्टपणे सांगितले.
बारामतीमधील एका सभेत बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. माझी राज्यसभेतील अजून दीड वर्षे बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचे की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या? आतापर्यंत 14 निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवले नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबले पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे, असे शरद पवार म्हणाले.
(हेही वाचा निवडणुकीआधी Ulema Board चा मविआला पाठिंबा; नाशिकमध्ये बेरोजगार मुस्लिम युवकांच्या खात्यात १२५ कोटी जमा)
त्यानंतर फलटणमध्ये प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यावेळी शरद पवारांच्या या वक्तव्याचा आधार घेत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, परवा बारामतीमध्ये भाषण करताना साहेबांनी सांगितले की माझी मुदत संपल्यावर मी बाजूला होणार. ते राजकारणापासून दूर राहिले तर काम कोण करणार? हाच पठ्ठ्या काम करणार. दुसऱ्याचा घास नाही. तिथे आपले नाणं खणखणीत आहे. मी अजून 10 वर्षे काम करणार. बैल म्हातारा झाला, आता त्यांना बाजार दाखवा असे काही जणांनी या आधी म्हटले होते, मला त्या खोलात जायचे नाही, असेही अजित पवार म्हणाले.