राज्यातील महायुतीच्या यशानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या दिवशी शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले, मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांचं नाराज असण्याचं काही कारण नव्हतं. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री निवडायचा हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे नाराजीचं कारण असूच शकत नाही. मागच्यावेळी शिंदे मुख्यमंत्री होते. आमच्याकडे अधिक संख्या होती. तरीही आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. त्यांच्या पाठी आम्ही पहाडासारखे उभे राहिलो. असं अमित शाह यांनी सांगितलं.
हेही वाचा-ED raids; मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई; १३० कोटींची मालमत्ता जप्त
बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोरीवर बोलताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले, “96 टक्के सीमा फेसिंग झाली आहे. चार टक्के बॉर्डर उघडी आहे. नदी, नाले आणि ओबधधोबड रस्ते आहेत. त्या ठिकाणी फेसिंग होऊच शकत नाही. अशा ठिकाणची गावे आम्ही निश्चित केली आहेत आणि त्यांची नावे सरकारांना पाठवली आहेत. कोणी रेशन कार्ड, आधारकार्ड बनवायला येत असेल तर त्यांची योग्य चौकशी करण्यास सांगितलं आहे.” असं ते म्हणाले.
हेही वाचा-Maharashtra Cabinet : मंत्रीमंडळ विस्ताराची नागपुरात तयारी; कोणाची लागणार मंत्रीपदी वर्णी
बांगलादेशींची घुसखोरी आम्ही ओडिशात रोखली आहे. आसाममध्ये रोखली आहे. बंगाल आणि झारखंडमध्ये अजून घुसखोरी होत आहे. त्या ठिकाणचे सरकार त्यावर काम करत नाही. उलट आमच्यावर आरोप ठेवत आहे. पटवारी आणि पोलीस काय करत आहेत? राज्याची सुरक्षा ही राज्याची जबाबदारी नाही का? अशा प्रकारची खालच्या स्तराचं राजकारण आम्ही कधी पाहिलं नाही. असंही अमित शाह (Amit Shah) म्हणाले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community