लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी सीमेवरील सुरक्षेबाबत चर्चा केली. यामध्ये जम्मू-काश्मिर (Jammu and Kashmir), चीन बॅार्डर (China border) आणि मणिपूर हिंसाचारावर (Manipur) त्यांनी महत्त्वाची वक्तव्य केली. जम्मू-काश्मिरमध्ये सध्या सक्रिय असलेले ८० टक्के दहशतवादी हे पाकिस्तानातील दहशतवादी आहेत. 2024 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी 60% पाकिस्तानी होते. सध्या खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. (Upendra Dwivedi)
पीएम मोदींनी चिनी नेत्याशीही केली चर्चा
पुढे बोलताना उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) म्हणाले, “सैन्याला स्वावलंबी बनवणे आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे हे माझे ध्येय आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी मीडिया आणि सुरक्षा दलांमध्ये एकत्र येण्याची क्षमता आहे. म्हणूनच मी माध्यमांशी बोलण्याची पद्धत स्वीकारतो. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आम्ही हळूहळू दहशतवादाकडून पर्यटनाकडे जात आहोत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (चीन सीमा) परिस्थिती संवेदनशील असली तरी नियंत्रणात आहे. या मुद्द्यावर पीएम मोदींनी चिनी नेत्याशीही चर्चा केली आहे. आता तेथे बफर झोन नाही. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत, मात्र आम्ही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
“देशाच्या उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमधील LAC विवादाची परिस्थिती ऑक्टोबर 2024 मध्ये सोडवली गेली आहे. आता या दोन्ही भागांत गस्तही सुरू झाली आहे. मी माझ्या सर्व सह-कमांडर्सना गस्तीबाबत जमिनीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. हे प्रश्न लष्करी पातळीवरच सोडवले जाऊ शकतात. LAC वर आमची तैनाती संतुलित आणि मजबूत आहे. उत्तरेकडील सीमेवर आमची लष्करी क्षमता वाढवताना आम्ही विशेष तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे.” (Upendra Dwivedi)
दहशतवादाकडून पर्यटनाकडे वाटचाल
लष्करप्रमुख (Upendra Dwivedi) म्हणाले की, गेल्या वर्षी मारले गेलेले 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते. सध्या खोऱ्यात सक्रिय असलेले 80 टक्के दहशतवादी पाकिस्तानी आहेत, असे आम्हाला वाटते. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये एलओसीवर स्वाक्षरी केलेला युद्धविराम करार अजूनही सुरू आहे. मात्र, सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. अलिकडच्या काही महिन्यांत उत्तर काश्मीर आणि डोडा-किश्तवाड पट्ट्यात दहशतवाद्यांच्या कारवाया दिसल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. लष्कराने गेल्या वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडल्या आहेत. मोठ्या बदलाची ही चिन्हे आहेत. दहशतवादाकडून पर्यटनाकडे आपण हळूहळू वाटचाल करत आहोत. अशी माहिती त्यांनी दिली.
ईशान्येकडील सुरक्षेबाबत 2 मुद्दे
- उत्तर-पूर्व भागातही परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. सुरक्षा दलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मणिपूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या असल्या तरी तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर सातत्याने काम करत आहे.
- सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि वरिष्ठ अधिकारी भारत-म्यानमार सीमेवरील सर्व समुदायांच्या नेत्यांशी बोलत आहेत. तसेच, सैन्याने आपत्ती नियंत्रणासाठी आपल्या QRT आणि QR वैद्यकीय संघांना अपग्रेड करण्यासाठी 17 कोटी रुपयांचे पॅकेज जारी केले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community