औरंगजेब (Aurangzeb) हा लुटारु होता, त्याचे कुटुंब लुटारु होते, भारत लुटायला तो आणि त्याचे खानदान आले होते, त्याचा आदर्श आपल्यापुढे कसा काय असेल? आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत असे विधान योगगुरु बाबा रामदेव महाराज यांनी केले. नागपुरात पतंजलीच्या फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी रामदेव बाबा बोलत होते.
छावा चित्रपट आल्यापासून महाराष्ट्रात औरंगजेबाची (Aurangzeb) चर्चा रंगली आहे. त्याचप्रमाणे अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर नव्हता तो उत्तम प्रशासक होता असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान नागपूरच्या कार्यक्रमात रामदेवबाबांनी औरंगजेब आमचा आदर्श असूच शकत नाही असे म्हटले आहे.
(हेही वाचा Water Tank साफ करताना 5 कामगारांचा मृत्यू)
रामदेवबाबा काय म्हणाले?
औरंगजेब (Aurangzeb) भारताचा आदर्श असूच शकत नाही, तो क्रूर होता. औरंगजेब लुटारु होता त्याचे कुटुंब लुटारु होते. बाबर काही भारतात काही घडवायला आला नव्हता. बाबर, अकबर, औरंगजेब त्यांची मुले या सगळ्यांनी हरम तयार केले. आपल्या हजारो आया-बहिणींची त्यांनी बेअब्रू केली. आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशी माणसे आपला आदर्श असूच शकत नाहीत. आपला सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, औरंगजेब (Aurangzeb) आमचा आदर्श असूच शकत नाही, असे योगगुरु बाबा रामदेव म्हणाले.
Join Our WhatsApp Community