राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याचे सुपुत्र मा. सा. कन्नमवार यांची आज (10 जाने.) 125 वी जयंती आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना कार्यक्रमाचे अध्यक्षपद देण्यात आले. यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा- सुप्रीम कोर्टाचा SBI ला दणका; म्हणाले, फसवणुकीची रक्कम देणे…
याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “मला माहित आहे की, चंद्रपूर हा वाघ आणि ‘वार’ चा जिल्हा आहे. सुधीर मुनगंटीवार आमचे नेते आहेत. तसेच विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवार हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे मी सांगतो की कुठलेही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो. ‘वार’ हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात नेहमी पुढे असतात.”
हेही वाचा- Mahavikas Aghadi मध्ये फाटाफूट; स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये एकत्र लढणार की नाही?
पुढे बोलताना फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “दादासाहेब कन्नमवार यांनी जास्त शिक्षण न घेताही त्यांनी आपलं व्यक्तिमत्व तयार केलं. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचा एक मोठा पगडा कन्नमवार यांच्यावर होता. त्या विचारातून त्यांचं नेतृत्व तयार केलं गेलं होतं. त्या काळात ते वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी काँग्रेसचं काम सुरू केलं होतं. आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही, अशा प्रकारची ती सर्व मंडळी होती. त्यामुळे त्यांनी एक मोठं संघटन उभं केलं.”
हेही वाचा- Sir Ratan Tata Trust : रतन टाटा यांच्या विश्वस्त मंडळात नोएल टाटांच्या मुलांच्या समावेशाने नवीन वाद
“ज्या वेळी संयुक्त महाराष्ट्र तयार झाला तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न होता तेव्हा विदर्भातील ५४ आमदारांचं मत होतं की आताच वेळ आहे. आपण आताच वेगळ्या विदर्भासाठी मागणी करू. मात्र, तेव्हा दादासाहेब कन्नमवार यांनी भूमिका घेतली की आता ही वेळ नाही. आता आपण महाराष्ट्र एकत्रित केला पाहिजे. आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. मग तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या पाठिमागे आपण उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे दादासाहेब कन्नमवार यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांना त्या काळात एक मोठं पाठबळ मिळालं.” असंही देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community