‘बटेंगे तो कटेंगे’ यावर काय म्हणाले RSS चे सहकार्यवाह होसबळे?

हिंदू एकता लोक कल्याणासाठी आहे. हिंदू सगळ्यांना सुख प्रदान करेल. जगातील कोणत्याही देशातील संकटात. त्यासाठी हिंदू एकता आवश्यक आहे, असे होसबळे म्हणाले.

291
लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेशातील भाजपाच्या परफॉर्मन्सनंतर हरियाणा विधानसभा निवडणुकीत प्रचारसभेत बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंना एकजूट राहण्याचे आवाहन केले. ‘बटेंगे तो कटेंगे’ असे घोषवाक्य त्यांनी म्हटले. त्या हरियाणात भाजपाचा विजय झाला. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत भाजपाने हेच घोषवाक्य बॅनर्सवर लिहून प्रचार सुरु केला आहे. या घोषवाक्यावर RSSचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.
आपण जाती, भाषा, प्रांतावरून भेद केला, तर आपण विभागले जाऊ. त्यामुळे एकता आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की, आपण हे कायम ठेवले तर समाजात केवळ उपदेश असता, तर झाले असते. प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी हे कृतीत आणावे लागेल. आज खूप सारे धार्मिक आणि इतर क्षेत्रातील लोक हे अनुभवातून समजत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्याचे स्वागत करत आहेत. हिंदू समाजाची एकता हे संघाचे जीवन व्रत आहे. आम्ही आग्रहाने सांगू आणि कृतीही करू, असे RSS दत्तात्रेय होसबळे म्हणाले.
हिंदू एकता लोक कल्याणासाठी आहे. हिंदू सगळ्यांना सुख प्रदान करेल. जगातील कोणत्याही देशातील संकटात. त्यासाठी हिंदू एकता आवश्यक आहे. स्वतःला जगवणे आणि जगाचे भले करणे, यासाठी आम्हाला हिंदू एकता हवी आहे, यात कोणतेही दूमत नाही. हिंदूमध्ये फूट पाडण्यासाठी शक्ती काम करत आहेत. त्याबद्दल सावध करावे लागते. त्याबद्दल सावधगिरी बाळगावी लागते. त्या अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. त्या हिंदूंना जातीच्या नावावर, विचारधारांच्या नावावर तोंडत आहेत. त्यामुळे आम्हाला सावध राहावे लागते, असेही RSS होसबळे म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.