Devendra Fadnavis : चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

91
Devendra Fadnavis : चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis : चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल (Chandiwal) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सचिन वाझे (Sachin Waze) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता असं चांदिवाल यांनी म्हटलं. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

(हेही वाचा-Maharashtra Vidhansabha Election 2024: ‘Vote Jihad’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; दोघांच्या आवळल्या मुसक्या)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मला ते सगळं माहिती आहे. त्या लोकांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्यांनी असे प्रयत्न केले. परंतु, ईश्वर माझ्या पाठिशी आहे, जनता माझ्या पाठिशी आहे.” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

चांदीवाल काय म्हणाले होते?
अनिल देशमुख, पलांडे, परमबीर सिंग यांना आम्ही दंड भरायला लावला होता. आम्हाला जे शपथपत्र दिलं होतं त्यानुसार सचिन वाझेंनी पुरावे दिले असते तर बराच खुलासा झाला असता. त्यांच्या शपथपत्रात त्यांनी दोन राजकीय व्यक्तींची नावं घेतली होती. आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख केला होता. ती नावं होती अजित पवार आणि शरद पवार. मी त्यांना ही नावं रेकॉर्डवर घेणार नाही, असं सांगितलं. नियमांत बसत नसल्याने मी ते रेकॉर्डवर घेतलं नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. सचिन वाझे व अनिल देशमुख यांनी फडणवीसांनाही (Devendra Fadnavis) गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यावेळी हे बोललो नाही कारण चर्चा करण्याला कारण मिळतं. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःची प्रसिद्धी नको होती. त्यामुळे मी त्यावेळी काही बोललो नाही. असं चांदीवाल म्हणाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.