राणा प्रकरणात शिवसेनेनं काय कमावलं आणि काय गमावलं

96

अभिनेत्री कंगना राणावत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला आव्हान दिले. मात्र, राणा दाम्पत्याच्या मातोश्रीच्याबाहेर हनुमान चालिसा पठन करण्याच्या मुद्दयावर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आणि मातोश्रीसह त्यांच्या खारी येथील निवासस्थानीही गर्दी केली. या प्रकरणात राणा दाम्पत्याला केलेल्या अटकेनंतर काही प्रमाणात शिवसेनेच्या विरोधात वातावरण आता पसरु लागला आहे. हनुमान चालिसाचे पठन करण्याचे केवळ आव्हान दिल्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून यामुळे शिवसेनेने हिंदुत्चाचा मुद्दा पूर्णपणे गमावला असल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला येवू लागल्या आहे. त्यामुळे शिवसेनेला आता राणा प्रकरणात काय कमावलं आणि गमावलं याचे विश्लेषण आता करण्याची वेळ आली आहे.

( हेही वाचा : कूपर रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन )

राणा दाम्पत्याला हनुमान चालिसाचे पठन आता महागात पडले असून आपल्या घरातच असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने जनतेमध्ये शिवसेनेच्या विरोधात तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येवून हनुमान चालिसा पठन करण्याचे आव्हान दिले होते, त्याने नमाज पडण्याचे तर आव्हान दिले नव्हते ना,असा सवाल आता जनतेकडून केला जात असून जर ते दाम्पत्य आपल्या खार येथील निवासस्थानी असताना त्यांच्या घरावर चाल करून जाण्याची शिवसैनिकांना काय गरज होती,असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिस बळाचा वापर करून आम्ही कुणालाही वाकवू शकतो या शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजप आणि तुमच्यात काय फरक आहे असाही सवाल जनतेकडून केला जात आहे.

यापूर्वी शिवसेनेने आपल्या विरोधात बोलणारा अभिनेत्री कंगना राणावत यांच्या घरातील बांधकामावर महापालिकेतील यंत्रणेला हाताशी धरून बुलडोझर चढववला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणात रॅलीमध्ये असताना त्यांच्या जुहूमधील घरावर मोर्चा काढला, त्यानंतर त्यांच्या घरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी त्यांना नोटीस पाठवून त्यांच्या बंगल्यावरही कारवाई करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यानंतर राणी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर पोलिस बळाचा वापर करत कारवाई त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आल्याने शिवसेनेच्या बाजुने असलेली सहानुभूतीही आता संपत चालली आहे. ईडीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कारवाईंना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार पोलिस आणिम महापालिका यंत्रणेला हाताशी धरुन करत असलेल्या कारवाई करत असले तरी भाजप आणि तुमच्यात फरकच काय असा सवाल जनतेकडून खासगीत केला जात आहे.

काय कमावलं :

  • शिवसैनिक चार्ज झाला
  • शिवसेनेतील मरगळ दूर झाली
  • आजवर केवळ केंद्राच्याविरोधात होणारी आंदालने, पण अशाप्रकारे एका व्यक्तीच्या विरोधात केल्याने उत्साह संचारला
  • शिवसेनेतील आक्रमकता पुन्हा प्राप्त झाली
  • मातोश्रीबाहेर मागील दोन ते अडीच वर्षांत पाऊल न ठेवणाऱ्या शिवसैनिकांना श्रध्दास्थानाच्या ठिकाणी जमता आलं
  • आजवर विभागामधील पदाधिकारी,कार्यकर्ते जमले जायचे, तिथे मुंबईतील सर्व कार्यकर्ते या निमित्ताने एकवटले
  • शिवसेनेमध्ये आजही तोच दम आणि रग आहे…अंगावर आला तर शिंगावर घेण्याची ताकद सरकारमध्ये असलो तरी आपल्याकडे आहे हे दाखवता आलं

काय गमावलं :

  • ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा मुद्दा गमावला
  • शिवसेनेकडे जो हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पाहिलं जात होतं, ती ओळख हनुमान चालिसाचं पठन करू न दिल्यानं पुसली गेली
  • शिवसेना आता धर्म निरपेक्षवादी असल्याची नवीन ओळख
  • सत्तेचा आणि पोलिस बळाचा वापर करण्यात आल्याने जनतेच्या हदयातील स्थानही गमावलं
  • हातातील दगड खाली ठेवून नव्याने बदलल्या जाणाऱ्या शिवसेनेची नवीन ओळख पुसून जुनी ओळख पुन्हा निर्माण झाली
  • पक्षप्रमुखांकडे आजही बाळासाहेबांसारखी दूरदृष्टी नसल्याची ओळख पटली
  • सामान्य जनतेच्या मनातील स्थानालाही बसला धक्का
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.