राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं. अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं? अधिवेशनाने देशाला, राज्याला चांगलं गाणं दिलं. हे समाधान मानावं लागेल. कबरीपासून कामरापर्यंत असं अधिवेशन आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)
हेही वाचा-Government Taxi : आता येणार सरकारी टॅक्सी ; अमित शाहांची संसदेत मोठी घोषणा
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) 3 अक्षरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं नामकरण केलं आहे. एकनात संभाजी शिंदे या नावाचा शॉर्ट फॉर्म करत ‘एसंशी’ ही शिवसेना नाही तो एक गट आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. मनसेकडूनही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला जात असल्यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. कारण, त्यांना कळते की या शिवाय पर्याय नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. (Uddhav Thackeray)
संभाजी भिडे यांनी वाघ्या कुत्र्यासंदर्भात केलेल्या टीपण्णीवरुन उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी कोणत्या झाडाचा आंबा खाल्ला आहे मला अजून कळालं नाही, असा मिश्कील टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. वाघ्या कुत्र्याबद्दल सगळ्या इतिहासकारांचा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच काय तो निर्णय घेतला पाहिजे. पण त्याचं काय करायचं ते करा पण त्याआधी अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं, ज्याचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं? याची आठवणही ठाकरेंनी करुन दिली. (Uddhav Thackeray)
हेही वाचा- Santosh Deshmukh हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेचा कबुली जबाब !
दिशा सालियन प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. जे प्रकरण मला माहित नाही, त्याबद्दल मी काय बोलू? असे म्हणत दोन वाक्यात विषय संपवला. (Uddhav Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community