Devendra Fadnavis : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यात झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. धारावीनंतर गोरेगाव येथील मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाचे (Adani Motilal Nagar Redevelopment Project) काम अदानी समूहाला मिळाले आहे. (Devendra Fadnavis)
हा संपूर्ण प्रकल्प ३६ हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र, राजकीय वर्तुळातील जाणकार सूत्रांच्या मते, धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हेदेखील दोघांमधील भेटीमागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. कारण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी नियोजित होते, त्याचे वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होईल, अशी घोषणा अदानी यांनी रविवारी केली.
अदानी प्रॉपर्टीजकडून सर्वाधिक बोली
अदानी समूहाची कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला (Adani Properties Private Limited) मोतीलाल नगर I, II, III, गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे १४३ एकरमध्ये पसरलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचा पुनर्विकास करणार आहे. अदानी प्रॉपर्टीजने या प्रकल्पासाठी ३६,००० कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. या अंतर्गत ३.९७ लाख चौरस मीटरचे बिल्ट-अप क्षेत्र बांधले जाणार आहे. या प्रकल्पाच्या वाटपाचे पत्र (LoA) लवकरच जारी केले जाण्याची अपेक्षा आहे.
(हेही वाचा – Navi Mumbai International Airport ‘या’ महिन्यापासून सुरू होणार; गौतम अदानी यांनी घेतला कामाचा आढावा)
अदानी समूहाची दुसरी मोठी पुनर्विकास योजना
धारावी पुनर्विकास प्रकल्पानंतरचा दुसरा सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या मुंबईतील मोतीलाल नगर येथील ३६,००० कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूह सर्वाधिक बोली लावणारा ठरला. गौतम अदानी यांनी ५००० हजार कोटींची बोली लावून मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्र धारावीचा प्रकल्प जिंकला होता. त्याच वेळी अदानी प्रॉपर्टीज ही नवीन कंपनी स्थापन केली होती. आता या कंपनीने दुसरी मोठी बोली जिंकली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community