पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना रविवारी, ३१ जुलै रोजी साडेनऊ तास चौकशी केल्यावर त्यांना ताब्यात घेतले आणि ईडीच्या कार्यालयात नेले. दिवसभर संजय राऊत यांची ईडीच्या १० अधिकाऱ्यांच्या पथकाने चौकशी केली. त्यावेळी संजय राऊत चौकशीला सहकार्य करत नाही म्हणून अखेर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांना ताब्यात घेतले. साडे नऊ तास ईडीचे अधिकारी संजय राऊतांच्या बंगल्यात काय करत होते, याचा तपशील संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिला.
- ईडी अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या संपूर्ण घराची झडती घेतली.
- घरात असलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि काही कागदपत्रे सोबत नेले.
- विशेष म्हणजे ईडीचे एक पथक राऊतांच्या मुलीला घेवून त्यांच्या दादर येथील निवावस्थानी गेले. तिथेदेखील अनेक तास अधिकाऱ्यांकडून झडती घेण्याचे काम सुरु होते.
- ईडीने राऊत यांच्या मैत्री बंगल्याचा तपास केला.
- त्यांनी बंगल्याच्या तिन्ही फ्लोअरची तपासणी केली. जेवढे कागदपत्रे हवे होते, तेवढे त्यांनी घेतले.
- अधिकाऱ्यांनी राऊत यांना प्रश्न विचारून काही माहिती घेतली.
(हेही वाचा ईडीने ताब्यात घेतल्यावर स्टंटबाजी करणाऱ्या वाचाळवीर राऊतांनी याआधी केलेली वादग्रस्त वक्तव्ये)
११.५० लाख रुपये जप्त
९ तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले असताना त्यांच्या घरातून ११.५० लाख रुपये जप्त करण्यात आले. यामध्ये दीड लाख रुपये घर खर्चासाठी ठेवले होते, उर्वरित १० लाख रुपये पक्षाचे पैसे आहेत, असे राऊत यांनी सांगितल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community