आदित्य ठाकरेंचं पक्षासाठी योगदान काय? Ramdas Kadam यांचा सवाल

38
आदित्य ठाकरेंचं पक्षासाठी योगदान काय? Ramdas Kadam यांचा सवाल
आदित्य ठाकरेंचं पक्षासाठी योगदान काय? Ramdas Kadam यांचा सवाल

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मविआचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी दापोलीत सभा घेतली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) आणि उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला आता रामदास कदम यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: राज्यात निवडणुकांमुळे ३ दिवस शाळा बंद राहणार? वाचा सविस्तर)

रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, “आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) तुमची औकाद आहे का? दिशा सालियन (Disha Salian Case) नावाची मुलगी होती, तिच्यावर बलात्कार झाला, तिला इमारतीवरुन ढकलून देण्यात आले. त्या प्रकरणात तुझं नाव होतं. तुला मी आज सांगतो, पुन्हा सत्ता आल्यावर या सगळ्या प्रकरणांची चौकशी नाही लावली तर मी माझं नाव रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणून लावणार नाही.”

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक)

“आदित्य ठाकरे तू रात्री 12 ला बाहेर पडतो, सकाळी 5 वाजता घरी येतो गुपचूप, याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राला कळू दे. अरे आपली औकाद बघून बोलायचे असते. शिवसेना पक्ष आम्ही वाढवलाय, केसेस अंगावर आम्ही घेतल्या, जेलमध्ये आम्ही गेलो. तुमचं पक्षासाठी योगदान काय? तुम्ही आयत्या बिळावर नागोबा बसलेत. कोणावर काय बोलताय, याचं भान ठेवा.” असा इशारा रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला होता.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.