काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा (Bitcoin Scam) वापर केला आहे, असे आरोप पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांनी केले आहे. भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवार, १९ नोव्हेंबरच्या रात्री पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आणि यासंबंधीचे कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले आहेत.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: मतदार ताटकळले! कुठे EVM Machine बंद, तर कुठे तांत्रिक बिघाड ? जाणुन घ्या…)
अखेर धक्कादायक तथ्ये समोर
सन २०१८ मध्ये रवींद्र पाटील यांची कंपनी KPMG बिटकॉइन क्रिप्टो चलन घोटाळ्यात फॉरेन्सिक ऑडिटसाठी नियुक्त करण्यात आली होती. रवींद्र पाटील त्याचे नेतृत्व करत होते. सन २०२२ मध्ये त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. ”१४ महिने मी तुरुंगात होतो. या वेळी मला का गोवण्यात आले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्यांसोबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काम करत राहिलो. अखेर धक्कादायक तथ्ये आमच्यासमोर आली”, असे माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी म्हटले आहे.
“Need cash in exchange of bitcoins…You need not to worry about inquiry… We will handle it when we come to power…”
NCP (Sharad Pawar) leader Supriya Sule to Gaurav Mehta, the employee of audit firm Sarathi Associates.
(3 voice notes) pic.twitter.com/Pulphd6Oki
— BJP (@BJP4India) November 19, 2024
दोघेही क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी
रवींद्र पाटील पुढे म्हणाले की, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे दोघेही क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी आहेत. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी बिटकॉइनचा गैरव्यवहार केला. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सायबर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भाग्यश्री नवटके हे बिटकॉइन घोटाळ्यात सहभागी होते. तसेच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचे संरक्षण होते, असे पाटील यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे ज्याच्याशी बोलल्या, तो गौरव मेहता कोण आहे ?
या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार गौरव मेहता (Gaurav Mehta) या ऑडिट फर्मचा कर्मचारी असून, त्याने गेल्या काही दिवसांत अनेकदा संपर्क साधला होता. पाटील यांनी प्रतिसाद दिला, तेव्हा मेहता यांनी सन २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी फसवणुकीच्या तपासाविषयी माहिती शेअर केली. मेहता यांनी आरोप केला की, क्रिप्टोकरन्सी व्यापारी अमित भारद्वाजच्या अटकेदरम्यान बिटकॉइन असलेले हार्डवेअर वॉलेट जप्त करण्यात आले. परंतु, पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेवरून हे वॉलेट बदलण्यात आल्याचा दावा मेहता यांनी केला. त्यामुळे रवींद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचा दावा मेहता यांनी केला. खरे गुन्हेगार गुप्ता आणि त्यांची टीम असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि नाना पटोले यांची नावे घेतल्याचा आरोपही पाटील यांनी मेहता यांच्यावर केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community