भाजपाचे (BJP) तरुण तडफदार नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधिमंडळ गटनेतेपदी वर्णी लागल्यानंतर आज (५ डिसेंबर) ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे २१ वे मुख्यमंत्री असणार असून आतापर्यंत त्यांनी तीनवेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसंच, विदर्भातील ते चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्रिपदाचा शपथविधीचा सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) उपस्थितीत होणार आहे. फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर येथे झाला. महाविकास आघाडीच्या काळात सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. तर शिंदे सरकारच्या काळात ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभाग संभाळत होते. (Devendra Fadnavis)
हेही वाचा- Maharashtra Rain : राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अंदाज काय सांगतो ?
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचे शालेय शिक्षण (education) नागपूर (Nagpur) शंकर नगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून पूर्ण केले. नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी पाच वर्षांच्या लॉ पदवीसाठी प्रवेश घेतला. १९९२ मध्ये त्यांनी लॉ पदवी मिळविली. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. जर्मनीतील डीएसई बर्लिन या संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स अंण्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
हेही वाचा- World Chess Championship : गुकेश, लिरेन दरम्यानचा आठवा डावही बरोबरीत; गुकेशने पराभव मात्र टाळला
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून केली होती. वयाच्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस हे अभाविपचे सक्रिय सदस्य होते. वयाच्या ४४ व्या वर्षी शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. (Devendra Fadnavis)
पाचवेळा विधानसभेवर निवडून आले (Devendra Fadnavis)
- देवेंद्र फडणवीस सलग पाच वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत आणि लोकनेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. भाजपच्या अंतर्गत, फडणवीस वॉर्ड संयोजक ते भाजप महाराष्ट्र अध्यक्ष बनले.
- 2020-21 मध्ये केरळ राज्य प्रभारी आणि केरळ, बिहार आणि गोवा निवडणूक प्रभारी म्हणूनही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
- महाराष्ट्रातील ऐतिहासिक 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नेतृत्व फडणवीस यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तसेच अनेक ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि जिंकल्या गेल्या.
- आर्थिक बाबींची सखोल जाण असलेल्या, पक्षीय स्तरावर त्यांचा आदर करतात. त्यांनी विधिमंडळाच्या विविध विषय समित्या, स्थायी समित्या आणि संयुक्त निवड समित्यांवर काम केले आहे. त्यांना कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला आहे.
राजकीय टप्पे (Devendra Fadnavis)
2013 – अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
2010 – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
2001 – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
1994 – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
1992 – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
1990 – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
1989 – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो
हेही पहा-
Join Our WhatsApp Community