देशभरात लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या मतदान निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार ०७ मे रोजी होत असून, यामध्ये महाराष्ट्रात एकूण ११ मतदारसंघात मतदान होत आहे. बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) राज्यातील सर्वच जनतेचे लक्ष लागून राहीले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून बारामती मतदारसंघात वेगवेगळे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. त्यामुळे बारामती मतदारसंघात नेहमीच वातावरण तापलेले असताना मंगळवारी मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे (Supriya Sule) अचानक अजित पवारांच्या पुणे येथील घरी (Ajit Pawar House) गेल्या त्यामुळे नवा राजकीय नाट्य कोणते असा सवाल बारामतीसह सर्वच नागरिकांना पडला आहे. (Ajit Pawar)
सुप्रिया सुळे यांनी मतदान करून अजित पवारांच्या काटेवाडी येथील घरी गेल्या. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर दिले. अजित पवारांची आई पुण्याला जाऊन राहिली असल्याची टीका भाऊ श्रीनिवास पवार यांनी केली होती. आज अजित पवार त्यांच्या आईला मतदानाला सोबत घेऊन आले. आशाकाकू आवर्जून मतदानाला आल्या म्हणून त्यांना भेटायला गेल्याचे कारण सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तसेच काटेवाडीतल्या घरी अजित पवार किंवा सुनेत्रा पवार नव्हत्या, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Team India Jersey: 2007 ते 2024 या कालावधीत T-20 विश्वचषकात भारताने किती वेळा बदलल्या जर्सी?)
यावेळी सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, आशाताईंच्या घरी आम्ही नेहमी येत असतो. तसेच आशाताईंच्या हातचे चपातीचे लाडू खूप छान असतात. हे माझ्या काका-काकींचे घर आहे. माझे बालपण काकींकडेच गेले आहे. माझ्या आईने जेवढे केले नसेल तेवढे काकींनी केले आहे. असे ही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आम्ही दर उन्हाळी सुट्टीत इकडे असायचो, अशी आठवण सुप्रिया सुळेंनी सांगितली.
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या ‘त्या’ कृतीची महापालिकेत चर्चा!)
गेल्या सहा महिन्यांपासून अजित पवार आणि शरद पवार कुटुंबीयांत वर्चस्वाची लढाई सुरु असताना लोकसभा निवडणूक लागली. यावेळी अजित पवारांनीसुप्रिया सुळेंविरोधात पत्नीलाच उमेदवारी देत अख्ख्या पवार कुटुंबाविरोधात वैर घेतले. बारामतीचे राजकीय वातावरण तापलेले असताना पार अगदी मिशा काढण्याच्या आव्हानापर्यंत गोष्ट गेली होती. तसेच सर्व पवार कुटुंबीयांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. (Ajit Pawar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community