युपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान संग्रहालयातून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी माउंट बॅटन आणि त्यांची पत्नी यांच्याशी जो पत्रव्यवहार केला होता, ती सर्व पत्रे असलेली ५१ खोकी घेऊन गेल्या, त्यांनी ती परत केली नाही. त्यांना त्याविषयी संग्रहालयाकडून वारंवार विनंती केली जात आहे, परंतु त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. यावर आता भाजपचे खासदार संबित पात्रा (Sambit Patra) यांनी जोरदार हल्लाबोल केला. नेहरूंची पळवलेल्या पात्रांमध्ये असे काय आहे, ज्यामुळे गांधी कुटुंब देशवासियांपासून लपवत आहेत, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालयाने (PMML) भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली वैयक्तिक पत्रे परत करण्याची औपचारिक विनंती केली सोनिया गांधी यांनी केली होती. जी 2008 मध्ये यूपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी यांना पाठवण्यात आली होती. 10 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात PMML सदस्य रिझवान कादरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून सोनिया गांधींची मूळ पत्रे परत घेण्याची किंवा त्यांची फोटोकॉपी किंवा डिजिटल प्रत देण्याची विनंती केली आहे. अशीच विनंती सोनिया गांधी यांना सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. (Sambit Patra)
याप्रकरणी भाजप खासदार पात्रा (Sambit Patra) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘सुरुवातीला या संग्रहालयात फक्त नेहरूजींच्या ऐतिहासिक नोंदी होत्या. यामध्ये नेहरूजींनी जागतिक नेत्यांना लिहिलेल्या सर्व पत्रांचा समावेश होता. नंतर असे उघड झाले की 51 बॉक्समध्ये नेहरूंनी एडविना माउंटबॅटन, जेपी नारायण आणि इतर अनेक नेत्यांना लिहिलेली पत्रे होती. 2008 मध्ये जेव्हा सोनिया गांधी यूपीए अध्यक्षा होत्या, तेव्हा एके दिवशी त्या संग्रहालयात गेल्या आणि ही सर्व पत्रे सोबत घेऊन गेल्या.आता एजीएम बैठकीदरम्यान इतिहासकार रिजवान यांनी राहुल गांधींना पत्र लिहून असे का करण्यात आले, अशी विचारणा केली. सार्वजनिक मालमत्ता असलेली ही महत्त्वाची पत्रे मिळवण्यासाठी करण्यासाठी त्यांनी राहुल गांधींना मदत करण्याची विनंती केली आहे.
Join Our WhatsApp Community