Union Budget मध्ये महाराष्ट्रासाठी काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

57
Union Budget मध्ये महाराष्ट्रासाठी काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
Union Budget मध्ये महाराष्ट्रासाठी काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी दि. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget ) सादर केला. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्याबरोबर शिक्षण, शेती, रोजगार, उत्पादन, लघू उद्योगासह अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यातच काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्राची (Maharashtra) निराशा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राला (Maharashtra) अर्थसंकल्पात काय मिळाले याची माहिती दिली आहे.

( हेही वाचा : पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू; राज्यमंत्री Dr. Pankaj Bhoyar यांचे आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाट्याला अर्थसंकल्पात (Union Budget ) काय आलं याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!

(टिप : ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.)

– मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
– पुणे मेट्रो : 699.13 कोटी
– एमयुटीपी : 511.48 कोटी
– एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
– मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
– सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
– महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
– महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
– नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
– मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
– ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी

अशाप्रकारे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अर्थसंकल्पात महाराष्ट्राला (Maharashtra) काय मिळालं हे सांगितले आहे. तसेच ही केवळ प्राथमिक माहिती असून विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल, असेही फडणवीसांनी या पोस्टमध्ये नमूद केले. (Union Budget )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.