जे काँग्रेसला १२ वर्षांत समजले नाही, ते भाजपाला दीड वर्षांत समजले! नितेश राणेंचा टोला

नारायण राणे यांची प्रशासनावर असलेली पकड, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा त्यांचा असलेला अभ्यास म्हणून आज देशाचे एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे, असे नितेश राणे म्हणाले.

141

नारायण राणे यांच्या कमबॅकचे श्रेय मी भाजपाच्या नेतृत्वाला देईन. जे काँग्रेसला १२ वर्ष समजले नाही, ते भाजपाच्या नेतृत्वाला दीड वर्षात समजले की नारायण राणेंची किंमत काय आहे, त्यांचे वजन काय आहे, त्यांचा अभ्यास व अनुभव काय आहे. काँग्रेसने वारंवार नारायण राणेंना शब्द देऊन देखील तो पूर्ण केला नाही. पण अवघ्या दीड वर्षात भाजपाने मला आमदारा केले, माझ्या मोठ्या भावाला प्रदेशस्तरावर काम करण्याची संधी दिली आहे. नारायण राणे यांना आज केंद्रीय मंत्री पद दिले, असा टोला नारायण राणे यांचे सुपुत्र, भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.

राणे भाजपला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर नेतील!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांचा शपथविधी झाला. यात मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांच्या यादीत पहिला मान हा महाराष्ट्राला नारायण राणे यांच्या रुपाने मिळाला. नारायण राणे यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. तर, त्यांच्या शपथविधी होताच त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांची प्रशासनावर असलेली पकड, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा त्यांचा असलेला अभ्यास आणि आज देशाचे एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे, असे नितेश राणे म्हणाले.  एक कार्यकर्ता म्हणून मला एवढा विश्वास आहे की भाजपाला पुढील प्रत्येक निवडणुकीत एक नंबरचा पक्ष बनवण्याच्या दृष्टीने नारायण राणे निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करतील, मेहनत करतील. कारण, आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास आणि अनुभवानुसार नारायण राणे पहिल्या दोन-तीन क्रमांकात आहेत. म्हणून याचा फायदा हा भाजपा संघटन म्हणून आम्हाला निश्चतपणे होईल. कोकण असो महाराष्ट्र असो जिथे जिथे आज भाजपा वाढवण्याची गरज आहे. तिथे आजचा दिवस हा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी महत्वाचा आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

 (हेही वाचा : ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तावर मोदींचे शिक्कामोर्तब! राणे बनले केंद्रीय मंत्री!)

राणे कुटुंबियांसाठी सुवर्णक्षण!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राणे कुटुंबीयांच्यावतीने मी मनापासून आभार मानतो. आज राणे कुटुंबीयांसाठी सुवर्णक्षण निश्चितपणे आहे, पण त्याच बरोबर एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांसाठी देखील महत्वाचा क्षण आहे, हे मला या निमित्त सांगायचे आहे, असेही भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.