महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात गुरुवारी (२८ नोव्हें.) रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री १०.३० ते १२ वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार, एकनाथ शिंदे (Eknath Shinde), सुनील तटकरे, प्रुफल पटेल आणि जे.पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्याचा पुढील मुख्यमंत्री (Maharashtra CM) आणि खातेवाटपाच्यादृष्टीने चर्चा झाल्याचे समजते.
शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा
बैठकीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मुंबईत भाजपाची बैठक होईल. त्यानंतर निर्णय होईल. दिल्लीतली आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली. मी होतो, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सगळे होते. चर्चा सकारात्मक होती. माझी भूमिका मी जाहीर केली आहे. मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.” (Eknath Shinde)
जनता समाधानी यातच आमचं समाधान
“डेडलॉक संपला आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो आहे. तसंच माझा चेहरा तुम्हाला गंभीर, कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात. महाराष्ट्राच्या जनतेसाठी कल्याणकारी योजना आम्ही केल्या. लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे. जनता समाधानी आहे यातच आमचं समाधान आहे.” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. (Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community