प्रफुल्ल पटेलांवर ईडीची कारवाई, हे पवारांना किती ’पटेल’?

69

ईडीमुळे शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं, असा आरोप राष्ट्रवादीकडून होत असताना शरद पवारांचे अगदी जवळचे सहकारी प्रफुल्ल पटेलांवर ईडीने कारवाई केलेली आहे. अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीसोबत प्रफुल्ल पटेल यांचे आर्थिक संबंध समोर आले आहेत. महत्वाचे म्हणजे मलिक यांच्यानंतर पटेल यांचे अंडरवर्ल्डशी संबंध उघड झाले आहेत आणि दोघेही शरद पवारांचे खास आहेत. त्यामुळे देशामध्ये शरद पवारांच्या भारताबद्दलच्या निष्ठेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

देश महत्वाचा की अंडरवर्ल्डशी संबंध?

सत्तेत असताना मलिक यांच्या राजीनाम्याला शरद पवारांचा विरोध होता. नवाब मलिकांवर इतके गंभीर आरोप झाल्यानंतर सुद्धा पवारांनी त्यांची पाठराखण केली होती. आता पवारांना देश महत्वाचा की अंडरवर्ल्डशी त्यांच्या सहकार्‍यांचे असलेले संबंध महत्वाचे आहेत, असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहेत. खरं पाहता राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत ही गंभीर घटना आहे. एकाच पक्षातल्या दोन नेत्यांचे अंडरवर्ल्ड व देशद्रोह्यांशी इतके घनिष्ट संबंध असतील तर जनतेची सुरक्षाच धोक्यात आली आहे ,असे म्हणावे लागेल.

पवारांची भूमिका काय?

चांगली बाब म्हणजे केंद्र सरकारने आता अंडरवर्ल्डच्या विरोधात युद्ध सुरू केलेलं आहे. काश्मीरच्या फुटीरतावाद्यांना जी अद्दल घडवली तीच अद्दल आता ह्या लोकांना घडू शकते. परंतु मूळ प्रश्न असा आहे की शरद पवारांची यावर काय भूमिका आहे? ते आपल्या पक्षातल्या देशद्रोह्यांविरोधात कारवाई करणार आहेत की, पुन्हा सरकारच्या नावाने बोटे मोडणार आहेत?

किती काळ असं राजकारण करणार?

सरकार पडल्यामुळे पवारांनी नुकतेच बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. पण नवाब मलिकांवर मात्र त्यांनी अद्याप कोणतीही कृती केलेली दिसत नाही. याचा अर्थ शरद पवारांची यास संमती आहे असे जनतेने समजावे का? अजून किती काळ पवार अशाप्रकारचं राजकारण करणार आहेत? पटेलांना अटक झालेलं पवारांना पटलेलं नाही. मग पटेल निर्दोष आहेत याचे त्यांच्याकडे पुरावे आहेत का? ते दोषी ठरले तर पवार जनतेची माफी मागणार आहेत का? महाराष्ट्रातल्या चाय बिस्कीट पत्रकरांमध्ये हे प्रश्न विचारण्याचं धाडस आहे का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.