वर्ष सरता मागे पाहताना…काय केले मुंबई महापालिकेने

123

पायाभूत सुविधांचा विचार करता सातत्याने प्रगतीपथावर असलेले सागरी किनारा रस्त्याच्या कामाने या वर्षात अधिक वेग घेत ६५ टक्क्यांपर्यंत कार्यपूर्ती केली. तर महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि मुंबईतील विविध ठिकाणांचे सुशोभिकरण या कामांचीही लक्षणीय प्रगती सरत्या वर्षाने अनुभवली. तर वर्ष अखेरीस मुंबईतील विविध ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यासारखी लोकोपयोगी योजना प्रत्यक्षात आली.

सन २०२२ या सरत्या वर्षाला निरोप देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर या वर्षात सुरु झालेल्या, प्रत्यक्षात आलेल्या काही ठळक बाबींची घेतलेली

• १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या कोविड लसीकरणास प्रारंभ.

• कोविड बाधेने मृत्युची नोंद शुन्यावर.

• कोविड लशीच्या मात्रेने ओलांडला १ कोटींचा टप्पा. वर्धक मात्रा देण्यास सुरुवात.

• मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) या अंतरासाठी जमिनीखाली खणण्यात आलेल्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण.

• जागतिक मधुमेह दिनी १ लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांची मधुमेह तपासणी.

• ‘व्हॉट्सअप चॅटबॉट’ सुविधेचा प्रारंभ. या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याकरिता मुंबईकर नागरिकांना आणखी एक संवाद पर्याय उपलब्ध.

• माझगांव परिसरात ‘वीर शिरोमणी महाराणा प्रताप’ यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण.

• हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून १०० मेगावॅट क्षमतेची संकरीत अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्प करार करण्यात आला.

• कुष्ठरोग जनजागृती पंधरवड्यानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन.

(हेही वाचा सायरस मिस्त्रीनंतर ऋषभ पंत; 2022 मध्ये Mercedes Benz कारचे दोन अपघात)

• रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दुभाजकांच्या रंगरंगोटीची कामे वेगात.

• राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष स्वच्छता अभियान.

• लोकशाही पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

• महानगरपालिकेचा सन २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्पिय अंदाज सादर.

• भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार – कर्मचारी – अधिकारी यांच्यासह प्रशासन कर्तव्य तत्पर.

• चैत्यभूमी परिसरालगत ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युविंग डेक’ चे लोकार्पण.

• धारावी परिसरात देशातील सर्वांत मोठ्या सुविधा केंद्राचे लोकार्पण. या ठिकाणी कपडे धुण्यासह आंघोळीची व प्रसाधन गृहांचीही सुविधा उपलब्ध.

• अंधेरीतील संगीतकार अनिल मोहिले उद्यानास नवीन रुपडे बहाल. विविध वाद्यांच्या आकर्षक प्रतिकृतीसह योगकेंद्र व व्यायामशाळा मुंबईकरांच्या सेवेत.

• क्षयरोग निदान करण्यासाठी सीबीनॅट संयंत्र कार्यान्वित.

• कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालयात फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित.

• पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापरास चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेईकल कक्षाचा शुभारंभ.

• वरळीतील महात्मा गांधी मैदानास (जांबोरी मैदान) विविध सुविधांसह नवीन रुपडे बहाल.

• मुंबईतील लसीकरणाने ओलांडला २ कोटींचा टप्पा.

• गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील उड्डाणपुलांचे भूमिपूजन.

• शीव परिसरातील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय येथे विस्तारित वसतिगृह इमारतीचे लोकार्पण आणि वैद्यकीय अधिकारी सेवा निवासस्थान इमारतीचे भूमिपूजन.

• मुंबई वातावरण कृती आराखडा अहवालाचे लोकार्पण.

• १२ वर्षे पूर्ण ते १४ वर्षे या वयोगटासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ.

• महानगरपालिकेच्या अखत्यारितील सेव्हन हिल्स रुग्णालयात अत्याधुनिक साधणांच्या सहाय्याने व सवलतीच्या दरात वैद्यकीय चाचण्या करण्याच्या सुविधेचा प्रारंभ.

(हेही वाचा शीख धर्मियांचा अवमान केलात, महाराष्ट्राची जनता नोंद ठेवील – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा  )

• महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज अभियानाद्वारे विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन गौरव.

• महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यासाठी ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ यांच्याशी सामंजस्य करार.

• जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारितील संस्थेद्वारे मुंबईची निवड.

• वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राण्यांच्या आधुनिक प्रदर्शन कक्षांचे लोकार्पण.

• स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) लगत आणि कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत उभारण्यात आलेल्या दर्शक गॅलरीचे लोकार्पण.

• शीव परिसरातील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात २ अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहांचे लोकार्पण.

• ‘सर्वांसाठी पाणी !’ या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धोरणाचा शुभारंभ.

• अन्न कच-यापासून वीज निर्मिती करुन त्यापासून वाहन चार्जिंग करणा-या स्टेशनचा शुभारंभ.

• वरळी किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातील जिर्णोद्वार कामांचा शुभारंभ.

• स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करुन ‘मराठी नाट्यविश्व व मराठी रंगभूमी संग्रहालय’ ही इमारत उभारली जाणार आहे. या अनुषंगाने बोधचिन्हाचे अनावरण.

• दादर – धारावी नाल्यावरील जुना पूल तोडून नवीन पूल उभारण्याचे काम अवघ्या १७ दिवसांत पूर्ण. महानगरपालिकेच्या अभियंत्यांची विक्रमी कामगिरी.

• बोरिवली पश्चिम परिसरातील आर. एम. भट्टड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण.

• लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील रक्त केंद्राला ‘राज्यस्तरिय रक्त दाता गौरव सन्मान’.

• बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील मुख्याध्यापकांना ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ द्वारे नेतृत्व कौशल्याचे धडे.

• कोविड रुग्णांची संख्या लक्षणीय स्वरुपात घटल्याने जंबो कोविड उपचार केंद्रे बंद करण्याचा निर्णय.

• लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र स्वतंत्र स्वरुपात कार्यान्वित.

• सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्यासाठी रुपये ५ हजार ८०० कोटी एवढ्या अंदाजित खर्चाच्या निविदा आमंत्रित.

• स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा प्रारंभ आणि मुंबईतील विविध ठिकाणी राष्ट्र ध्वजाच्या ३ रंगातील आकर्षक व प्रेरणादायी रोशणाई.

• महानगरपालिकेचे अग्निशमन जवान योगेश बडगुजर व प्रणित शेळके यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असणा-या माऊंट एल्ब्रसवर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला.

• लम्पी विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशु वैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे यशस्वीपणे राबविण्यात विविध उपाययोजना.

• महानगरपालिकेच्या ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि व्हिजन – २०२५’ चे प्रकाशन.

• ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेची अंमलबजावणी प्रगतीपथावर.

• अचानक हृदय बंद पडणे व त्यावरील प्राथमिक उपचार याबाबत जनजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

• क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी.

(हेही वाचा धक्कादायक खुलासा; शीझानच्या नादी लागून तुनिषा हिजाब घालू लागलेली)

• इमारतीला मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेल्या विविध परवानग्यांची व सुविधांची माहिती एका क्लिकवर प्राप्त.

• हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे लोकार्पण. पहिल्या टप्प्यात ५२ ठिकाणी दवाखाने सुरु. एकूण २२० ठिकाणी दवाखाने सुरु करण्याचे नियोजन. सर्व दवाखान्यांमध्ये विविध वैद्यकीय तपासण्यांसह औषधोपचार व १४७ चाचण्यांची सुविधा.

• वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयास १६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा.

• न्यूमोनिया आजारास प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेचे विशेष अभियान सुरु.

• लहान बालकांमध्ये आढळून आलेल्या गोवर बाधेच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे लसीकरणासह विविध स्तरिय उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी.

• मुंबईचा कायापालट करण्यासाठी ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाची सुरुवात.

• मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प अंतर्गत विविध ५०० ठिकाणी सुशोभिकरण कामांचे नियोजन व अंमलबजावणी सुरुवात.

• मुंबईतील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २ दिवसीय विशेष कार्यशाळेत देशभरातील ७५ तज्ज्ञ मंडळींचा सहभाग.

• जी – २० शिखर परिषदेचे यजमानपद प्रथमच मुंबई महानगरीस

• जगातील काही भागात कोविड विषाणूचा उद्भवलेल्या प्रादुर्भावाच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध स्तरिय अंमलबजावणीचे नियोजन व रंगीत तालिम.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.