शिंदेंकडे नगरविकास, फडणवीस गृह आणि अर्थ मंत्रालयाचे कारभारी?

66

भाजप-शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खाते वाटपाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती संभाव्य खाते वाटपाची यादी लागली असून, शिंदेंकडे नगरविकास, तर फडणवीस गृह आणि अर्थ मंत्रालयाचे कारभारी होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हे १८ जण झाले मंत्री; शपथविधी सोहळा सुरू)

आदित्य ठाकरेंनी सांभाळलेल्या पर्यावरण आणि पर्यटन खात्याची धुरा दीपक केसरकर यांच्याकडे जाण्याची शक्यता असून, राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल आणि सहकार मंत्रालय मिळू शकते. फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेल्या मुनगंटीवार यांच्याकडे ऊर्जा आणि वन मंत्रालयाचा कारभार सोपवला जाऊ शकतो.

चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, तर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रालयाची धुरा दिली जाऊ शकते. बहुचर्चित संजय राठोड यांच्याकडे ग्रामविकास, तानाजी सावंत उच्च आणि तंत्र शिक्षण, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग विभागाचा कारभार दिला जाऊ शकतो.

संभाव्य खाते वाटप

शिवसेना

  • एकनाथ शिंदे – नगरविकास
  • गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
  • दादा भुसे – कृषी
  • संजय राठोड – ग्रामविकास
  • संदिपान भुमरे – रोजगार हमी योजना
  • उदय सामंत – उद्योग
  • तानाजी सावंत – उच्च आणि तंत्र शिक्षण
  • अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
  • दीपक केसरकर – पर्यटन आणि पर्यावरण
  • शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क

भाजप

  • देवेंद्र फडणवीस – गृह आणि अर्थ
  • राधाकृष्ण विखे पाटील – महसूल आणि सहकार
  • सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा आणि वन
  • चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
  • विजयकुमार गावित – आदिवासी विकास
  • गिरीश महाजन – जलसंपदा
  • सुरेश खाडे – सामाजिक न्याय
  • रवींद्र चव्हाण – गृहनिर्माण
  • अतुल सावे – आरोग्य
  • मंगलप्रभात लोढा – विधि व न्याय
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.