- खास प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारमध्ये रायगड (Raigad) आणि नाशिक (Nashik) जिल्हा पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आमदारांकडून होत आहे.
वाद कशावरून?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्यापूर्वी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती. रायगडमध्ये आदिती तटकरे व नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदावर नियुक्ती झाली आणि काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशातूनच या नियुक्तीला स्थगिती दिली. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. रायगड (Raigad) जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले यांनी केली आहे तर नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे तसेच शिवसेनेचे दादा भुसे यांनी दावा केला असल्याची चर्चा आहे.
(हेही वाचा – २३ धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी; अद्याप अधिसूचनेवर कार्यवाही नाही; Bombay High Court मध्ये सुनावणी)
रायगड वादावर तोडगा काय निघू शकतो?
१. रायगड (Raigad) जिल्ह्याबाहेरचा पालकमंत्री नेमणूक होऊ शकते.
२. शिवसेनेचे भरत गोगावले यांची नियुक्ती होऊ शकते.
३. भरत गोगावले आणि आणि आदिती तटकरे यांना अडीच-अडीच वर्षे पालकमंत्री पद वाटून दिले जाऊ शकते.
४. पालकमंत्री पद भाजपाने स्वतःकडे घेऊन भाजपाच्या मंत्र्याची नियुक्ती करावी.
५. रायगडचे (Raigad) पालकमंत्री पद आदिती तटकरे यांच्याव्यतिरिक्त अन्य राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडे सोपवले जाऊ शकते.
नाशिक वादावर तोडगा काय निघू शकतो?
१. मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीची समजूत काढून गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद कायम ठेवले जाऊ शकते.
२. पालकमंत्री पदावर जिल्ह्याबाहेरील भाजपा मंत्र्याची नियुक्ती होऊ शकते.
३. अडीच अडीच वर्षे पालकमंत्री पद विभागूण दिले जाऊ शकते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community