जेव्हा तुम्ही राजकारणात येता तेव्हा तुम्हाला तुमचे सर्वस्व देणे अपेक्षित असते. त्यासाठी २४ तास उपलब्ध असणे गरजेचे असते. कारण आपला एक निर्णय लोकांचे जीवन बदलून टाकणारा असतो. मी सध्या पूर्णवेळ राजकारणासाठी देऊ शकत नाही. कारण माझ्या कुटुंबाकडे पाहण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, तसेच मी नोकरीही करत आहे. ज्या वेळी मला वाटेल मी पूर्णवेळ राजकारणासाठी देऊ शकते, तेव्हाच मी राजकरणात प्रवेश करण्याचा निर्णय घेईन, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. एका मराठी वृत्त वहिनीच्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.
कोण ट्रोल करते?
मला सर्वसामान्य लोकांमधून कुणी ट्रोल करत नाही, याची मला शास्वती आहे. कारण मी तपासले तेव्हा मला ट्रोल करणारे राष्ट्रवादीचे पेड ट्रॉलर असल्याचे दिसले होते. मला सुषमा अंधारे यांच्या आणि माझ्यात साम्य जाणवते. कारण त्या कुणाला घाबरत नाहीत, स्पष्ट बोलतात. पण आता त्यांच्यात बदल झालेला दिसत आहे, त्या त्यांना दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवू लागल्या आहेत. त्यांच्या मागे किंवा पुढे मास्क आहे, त्यामुळे त्या स्वतः दिसत नाहीत. मी गाणं गाते, कारण मला छंद आहे. माझ्या गाण्यावरून सर्वसामान्य ट्रोल करत नाही, राष्ट्रवादी आणि सेनेवाल्यांचे ५ पैशांचे ट्रोलर मला ट्रोल करत असतात. देवेंद्र फडणवीसांमुळे मी नोकरी करत असलेल्या ऍक्सिस बँकेला सरकारी सॅलरी अकाउंट मिळाले हा आरोप खोटा आहे. जे पोलिसांचे सॅलरी अकाउंट या बँकेत आहेत ते २००५ सालापासून आहे. बँकेने त्यांच्या दर्जात्मक कामामुळे ते मिळवले आहे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
(हेही वाचा तेलंगणाच्या आरोग्य संचालकांनी तोडले अकलेचे तारे; भारतात कोरोना येशूमुळे नियंत्रणात)
Join Our WhatsApp Community