दहशतवादी याकूबची कबर कोणी सजवली? महापालिका आयुक्त म्हणतात…

85

दहशतवादी याकुबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र दहशतवादी याकूबची कबर कधी आणि कुणी सजवली, हा प्रश्न अद्याप कायम आहे. याप्रकरणाबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पालिकेचा संबंध नाही

एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, बडा कब्रस्तान आमच्या न्यायकक्षेत येत नाही. त्यामुळे आम्ही त्यावर कोणतीही कारवाई करणार नाही किंवा तसा तपास आम्ही करू शकत नाही. ही एका खासगी मुस्लिम ट्रस्टची जागा आहे. मुंबईत इतरही अनेक कब्रस्तान आहेत, ज्या आमच्या अधिकारक्षेत्रात येतात. त्यात हे कब्रस्तान असतं तर आम्ही त्याची तपासणी केली असती. मात्र या कबरीशी पालिकेचा संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – राऊतांच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्या, न्यायालयाचे ईडीला आदेश)

समोर आलेल्या माहितीनुसार, याकूब मेमनच्या कुटुंबातील १४ जणांची कबर बडा कब्रस्तानमध्ये आहे. गेल्या ५ वर्षांपूर्वी या ठिकाणी असलेल्या जागेत एक मोठं झाडं पडल्यानंतर ती जागा सुरक्षित करण्यात आली यासाठी संस्थेने कठडा बांधण्याची परवानगी दिलेली होती. परंतु मार्बलने हा कठडा बांधण्याची परवानगी नव्हती. १९ मार्च २०२२ रोजी बडी रात या दिवशी या ठिकाणी लाईट लावण्यात आलेल्या होत्या. यापैकी काही लाईट काढण्यातही आल्या होत्या मात्र त्यावरील एलईडी लाईट तशाच होत्या. आता या चौथऱ्याची लाईट काढण्यात आली आहे. दरम्यान, यावरील सुशोभिकरण आणि मार्बलचा चौथरा काढण्याच्या संदर्भात काही कारवाई केली जाते का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.