पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी रविवारी, ३१ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर ९.३० तास चौकशी केल्यावर त्यांना ईडीने ताब्यात घेतले. संजय राऊतांना पोलिसांनी ईडीच्या कार्यालयात आणल्यावर राऊतांनी माध्यमांशी बोलताना, मला अटक होणार आहे, असे वक्तव्य करत त्यांनी कार्यालयात प्रवेश केला.
महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
कारवाईला मी निधड्या छातीने सामोरे जायला तयार
यावेळी संजय राऊत म्हणाले, जी काही कारवाई होते ती होऊ द्या, मी घाबरत नाही. पक्ष माझ्या पाठीशी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी आहेत, शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत. हा संजय राऊत कधी गुडग्यावर चालत नाही, सरपटत चालत नाही. या कारवाईला मी निधड्या छातीने सामोरे जायला तयार आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधातील लोकांच्या विरोधात ज्या काही कारवाया सुरु आहेत, त्याविरोधात लढण्यासाठी बळ मिळणार आहे. आमच्यासारखे जे लोक आहे जे न झुकता कारवाईला सामोरे जातात. काही झाले तरी मी शिवसेना सोडणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा देशमुख, मलिक, संजय राऊतांंना अडचणीत आणणारा PMLA कायदा आहे तरी काय?)
माझ्यावरील कारवाईमुळे महाराष्ट्राला बळ मिळणार
संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो, शिवसेनेमुळे या कारवाईला मी निधड्या छातीने सामोरे जाईन. त्यामुळे महाराष्ट्राला याविरोधात लढायला बळ मिळेल, अशा कारवाईला घाबरून मी पक्ष सोडणार नाही, पण मी घाबरून पक्ष सोडणार नाही, कोणतेही कागदपत्रे माझ्याकडे सापडले नाही, कुठला पत्रा चाळ, कुठला पत्रा मला माहीत नाही, तो पत्रा गांजला की नाही हे मला माहित नाही, शिवसेना संपवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई करण्यात आली. कर नाही तर डर कशाला?, असेही संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा sanjay raut ED Inquiry : निर्लज्जपणाचे कारस्थान सुरु आहे – उद्धव ठाकरे)
Join Our WhatsApp Community