उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न होता; CM Eknath Shinde यांचा गौप्यस्फोट

ANI ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

182
Maharashtra Assembly Election Result 2024 : खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या न्यायालयातही त्याच शिवसेनेला दिला कौल!

गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो तेव्हा मला झेड सुरक्षा प्रदान करायची होती तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी नकार दिला होता. मला माझ्या विरोधात काय काय गोष्टी चालल्या ते समजले होते. माझ्यासाठी ते शॉकिंग होते. मला तेव्हा धमक्या आल्या होत्या. कारण नक्षल्यांचा खात्मा करण्याचे काम मी त्यावेळी केले होते. त्यावेळी मला झेड प्लस सुरक्षा देण्याचा विषय आला होता. गृहमंत्र्यांनी ठरवले की झेड प्लस सुरक्षा द्यावी. मात्र उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फोन करुन मला तशी सुरक्षा देऊ नये सांगितले. मला गृहमंत्री कार्यालयातूनच फोन आला होता. त्यावेळी मला अडकवण्याचा आणि तुरुंगात धाडण्याचाही प्रयत्न झाला. माझ्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला. ते विरोधी पक्षनेते होते मात्र मी तर उद्धव ठाकरेंच्या जवळचा होतो. त्यामुळे ते माझ्याशी असे का वागले याचे मला नवल वाटले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला.

ANI ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. अनिल देशमुख हे जेव्हा गृहमंत्री होते, तेव्हा भ्रष्टाचार हा खुलेपणाने चालला होता. त्यावेळी मी उद्धव ठाकरे, अजित पवार यांना कल्पना दिली होती. गृहखाते हे कायदा सुव्यवस्था सांभाळणारे खाते आहे. मी म्हटले होते की भ्रष्टाचार खुलेपणाने चालला आहे त्यात तुम्ही लक्ष घाला. पण त्यावेळी भ्रष्टाचार बोकाळला होता. त्याची किंमत अनिल देशमुखांना मोजावी लागली. अनिल देशमुखांना उद्धव ठाकरेंनी सांगायला पाहिजे होते असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर Uddhav Thackeray यांनी बोलावे; पू. संभाजी भिडे यांचे आवाहन)

भाजपाने अनेक राज्यात मित्रपक्षांचे कमी आमदार असूनही मुख्यमंत्री बनवले होते. ज्यादिवशी निकाल आले तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत असं विधान केले. मुख्यमंत्री बनायचं या रणनीतीने त्यांनी सर्वकाही ठरवले होते. गुवाहाटीला जाणं ही आमची रणनीती होती. उद्धव ठाकरेंचा मला फोन आला. मी रस्त्यात जाताना त्यांच्याशी बोलत होतो. तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर येतील. वरळीतूनच तुम्ही जायचं आहे अशा धमक्या दिल्या. मी मुंबईत आलो तिथे रोडने प्रवास केला. धमक्या कुणाला देता, मी कुणाला घाबरत नाही असंही एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) म्हटलं. दरम्यान, अनिल देशमुख गृहमंत्री असताना भ्रष्टाचार उघडपणे सुरू होता. मी हे मुख्यमंत्री आणि अजित पवारांनाही सांगितले होते. गृह विभाग हे कायदा सुव्यवस्था सांभाळणारा विभाग आहे. मात्र तो भ्रष्टाचार सुरूच होता त्याची भरपाई देशमुखांना करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना बोलायला हवं होते. आमचे कार्यकर्ते जेलला जात होते. आमदारांना मतदारसंघात काम करता येत नव्हते. विचारधारेला फटका बसत होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काही बोलले त्यावेळी मौन बाळगावं लागत होते. आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे करत असलो तरी दुसऱ्या धर्म जातीचा अपमान केला नाही. मात्र आमच्या विचारधारेला तोडमोड करण्याचं काम मविआत होत होते. त्यामुळे आमदार चिंतेत होते. शरद पवारांनी स्वत: त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची परिस्थिती माहिती असावी. घरात बसून राज्य करू शकत नाही हे त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.