औरंगजेबाची कबर राज्यातून हटवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील हिंदू करत आहेत. कधी हटणार औरंगजेबाची कबर? माझा आता एकच संकल्प आहे, भारत हिंदू राष्ट्र बनवणे आणि औरंगजेबाची कबर इथून हटवणे, असे तेलंगणाचे आमदार राजा सिंग म्हणाले. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील हिंदूंचा हाच प्रश्न आहे, असाही दावा आमदार राजा सिंग (MLA Raja Singh) यांनी केला.
विश्व हिंदू परिषदेने शिवजयंतीच्या निमित्ताने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठीच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील काही नेतेमंडळींनीही तशा प्रकारची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे तेलंगणातील आमदार राजा सिंग (MLA Raja Singh) यांनी पुण्यात बोलताना औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात विधान केले.
(हेही वाचा Amritsar Temple Blast: अमृतसरमध्ये मंदिरावर ग्रेनेड हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर !)
औरंगजेबाची कबर म्हणजे विषारी तलवार – आमदार राजा सिंग
औरंगजेबाने त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकले. सख्ख्या भावांना ठार केले आणि आपली मंदिरे उद्ध्वस्त केली. त्याची महाराष्ट्रातली कबर ही एखाद्या विषारी तलवारीसारखी आहे. आधी फक्त महाराष्ट्रातले हिंदू कबरीबाबत विचारणा करत होते. आता अवघ्या देशातले हिंदू विचारत आहेत की औरंगजेबाची कबर अजूनही इथे का आहे?, असा उल्लेख राजा सिंग यांनी यावेळी केला. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर कारसेवा करण्याची इच्छा बोलून दाखवली असून त्याला आपले समर्थन असल्याचे राजा सिंग (MLA Raja Singh) म्हणाले.