उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना लाडकी बहिण योजनेवर भाष्य केलं. “महायुती सरकारच्या काळात सुरू झालेल्या राज्यातील कुठल्याही योजना बंद करण्यात आल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना आजही सुरू आहेत. शिवभोजन थाळी असेल, आनंदाचा शिधा असेल किंवा लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) असेल ह्या योजना आजही सुरू आहेत, यापुढे देखील सुरूच राहतील.” असं शिंदे म्हणाले आहेत. (Eknath Shinde)
राज्यातील एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ती आणखी सुरू आहे, पण काहीजण म्हणत होते ही योजना फसवी आहे, खरं नाही. पण, या योजनेसह, लेक लाडकी योजना, शासन आपल्या दारी व इतरही योजना सुरू आहेत. शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा ह्या योजनाही बंद नाहीत, त्या चालूच आहेत. ज्या पात्र बहिणी आहेत, त्यापैकी एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही, असा शब्दच एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिला. मात्र, निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच याचा लाभ मिळेल, जर चारचाकी गाडी असेल किंवा निकषात नसेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही. असेही शिंदे म्हणाले. (Eknath Shinde)
हेही वाचा- Coal : भारताने कोळसा उत्पादनात ओलांडला १ अब्ज टनाचा टप्पा
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सांगितलं आहे की, सरकारने कोणतीही योजना बंद केलेली नाही. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतही सध्या दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही ही रक्कम वाढवून २१०० रुपये देऊ,” असं शिंदे यांनी आश्वस्त केलं आहे. (Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community