राज्यात भक्कम महायुतीचे सरकार सत्तेत आले. मंत्री ठरले, शपथविधी झाला. मात्र अजूनही पालकमंत्री पदाचा वाद हा कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात पालकमंत्री (Guardian Minister) पदाचा तिढा प्रजासत्ताकदिनापूर्वी सुटलेला असेल, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. (Chandrashekhar Bawankule)
(हेही वाचा – 8th Pay Commission : आठवा वेतन आयोग नेमका कधी स्थापन होणार? तो कसं काम करणार?)
मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील
चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार १७ जानेवारी रोजी नागपूर जिल्हा परिषदेच्या (Nagpur Zilla Parishad) कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांविषयी महायुती सरकारमध्ये कोणताही पेच नाही. पण ३ पक्षांची युती असल्यामुळे सर्वांच्याच मतांचा विचार करावा लागतो. पण आता ही अडचणही राहिली नाही. त्यामुळे २६ जानेवारीपूर्वी प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर झालेला तुम्हाला दिसेल. मुख्यमंत्री याविषयी पुढील काही दिवसात योग्य तो निर्णय घेतील. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात पालकमंत्री कोण होते हे कुणालाही ठावूक नव्हते, असे नमूद करत नागपूरचे तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत यांना टोला लगावला आहे.
(हेही वाचा – Chhagan Bhujbal राष्ट्रवादीपासून दूर ? पक्षात दरी वाढल्याची चर्चा)
महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेऊन माही निवडणूक आयोगाला निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरणात का बदल करण्यात आला? असा सवालदेखील यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “कोणत्याही प्रकरणात एखादी याचिका न्यायालयात दाखल होते तेव्हा सरकारला त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगितले जाते. या प्रकरणातही सरकारकडून उत्तर दिले जाणार आहे,” अशी सावध प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर (Chandrasekhar Bawankule) त्यांनी दिली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community