एसटीबाबत सरकारला पाझर फुटेल का? पडळकरांचा सवाल

गेले कित्येक दिवस आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे. हा संप मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले तरीही, एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी सरकारमध्ये चर्चा सत्र सुरू आहेत पण, अद्याप तोडगा निघालेला नाही. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने एसटीच्या शिष्टमंडळाला निमंत्रित केले आहे, अशी माहिती गोपीचंद पडळकरांनी दिली आहे.

काय म्हणाले पडळकर ?

एसटी विलिनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी सरकारकडे कर्मचाऱ्यांचे अधिकृत शिष्टमंडळ जाणार आहे. यामध्ये पाच स्त्रिया व पुरूषांचा समावेश असेल. अशी माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे. तसेच एवढे दिवस झाल्यानंतर कर्मचारी माघार घेतील असे सरकारला वाटले होते पण काही झाले तरी, एसटी कर्मचारी महामंडळाचे विलिनीकरण झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा देखील पडळकरांनी सरकारला दिला आहे.

( हेही वाचा : परमबीर सिंह, ३० दिवसांत हजर व्हा! न्यायालयाचा आदेश )

चर्चा करून निर्णय

सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून शिष्यमंडळ केव्हा जाणार, दिवस, वेळ याबाबत निर्णय घेतला जाईल असे गोपाचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विलिनीकरणार ठाम आहे असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here