महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला आहे. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत मविआचा सुपडा साफ केला आहे. दरम्यान, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री म्हणून जे नाव जाहीर होईल त्याला पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभुमीवर अजित पवारांनी (Ajit Pawar) महत्त्वाचं विधान केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर या दोन दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला नव्या सरकारमध्ये असेल.” (Ajit Pawar)
हेही वाचा-Central Railway च्या दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलले; जाणुन घ्या …
एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांनी महायुतीला साजेशी भूमिका घेतली त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले. तसंच दिल्लीत आज (२८ नोव्हेंबर) महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे त्यानंतर नाव समोर येण्याची शक्यता असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. (Ajit Pawar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community