ज्या नाल्यातील गाळ योग्य वेळी काढला नाही तर माहुल परिसर जलमय होतो अशा माहुल खाडीला मिळणाऱ्या माहूल नाल्यापर्यंत ना कंत्राटदार पोहोचलेला,प्रशासन, ना सत्ताधारी असे विदारक चित्र समोर आले आहे. माहुल नाल्याचा भाग गवत आणि अन्य झाडे रोपटी उगवल्याने हरित बनला असून खारु क्रीकच्या भागात आजूबाजूच्या विकास कामांचा राडारोडा पडल्याने या दोन्ही नाल्यातून नागरिक ये जा सुरू असून हे नाले कधी साफ होणार अशी विचारणाच आता नागरीक करू लागले. प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी सफाई साठी केलेल्या पाहणीत भाजपच्या नेत्यांसमोर नागरीक अशाप्रकारे कैफियत मांडताना दिसत आहेत.
( हेही वाचा : ‘वसंतसेना ते शरदसेना’ असा शिवसेनेचा प्रवास! संदीप देशपांडेंनी घेतला समाचार )
नाल्यांच्या कामांची पाहणी
सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई भाजपतर्फे मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यात येत असून भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आज चौथ्या दिवशी माहुल,सायन, वडाळा शिवडी या भागातील नाल्यांच्या कामांची पाहणी करण्यात आली.
माहुल येथील जो नाला माहुल खाडी ला जाऊन मिळतो या नाल्यातील गाळ योग्य वेळ काढला नाही तर माहूल परिसर जलमय होतो. तसेच नाल्यात साचलेला गाळ, प्लास्टिक खाडीत गेले तर कोळी बांधवांच्या जाळ्यांचे ही नुकसान होते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या या माहुल नाल्यातील साफसफाईचे काम योग्य वेळी कोणी आवश्यक असतानाही अद्याप महापालिका प्रशासन न कंत्राटदार न सत्ताधारी या नाल्यापर्यंत पोहोचले आहेत, नाल्यात प्रचंड झाडे झुडपे, जलपर्णी असे भयावह चित्र आज भाजपच्या नालेसफाई दौऱ्यात समोर आले.
तसेच सायन येथील नाल्याच्या कामाला आता सुरुवात झाली असून भाजपाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होताच कंत्राटदारांची तारांबळ उडाली आहे त्याचे चित्र मंगळवारी सायन येथे पहायला मिळाले. वडाळ्यापर्यंत अद्याप कंत्राटदार न आल्यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. मंगळवारी भाजपच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी वडाळ्यातील नागरिकांनी आमदार अँड आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या आणि पालिका प्रशासन याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
या पहाणी दरम्यान, आमदार कालिदास कोळंबकर, कॅप्टन तमील सेलवंन, महापालिका माजी गटनेते प्रभाकर शिंदे,प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर,माजी नगरसेविका राजश्री शिरवडकर, नेहल शाह, कृष्णवेणी रेड्डी, महादेव शिवगण व विलास आंबेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community