पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या (West Bengal) दौऱ्यावर आहेत. हावडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी टीएमसीसह (TMC) विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, टीएमसी घोटाळ्यांचे खुले उद्योग चालवते. बंगालचा लॉटरी घोटाळा हे त्याचे मोठे उदाहरण आहे. तसेच टीएमसीच्या एका नेत्याचे म्हणणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत (Bhagirathi River) फेकून देतील. त्यांच्यात एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? भर सभेत असा सवाल करत तृणमूल कॉंग्रेसवर (Trinamool Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्ला चढवला. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Shashi Tharoor : रेड कार्पेट अंथरुन स्वागत करू; शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्याचे शशी थरुर यांनी केले स्वागत)
पश्चिम बंगालमधील बराकपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, टीएमसीच्या एका नेत्याचे म्हणणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे? टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
(हेही वाचा – Leopard Cat : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आढळले बिबट मांजर)
टीमसीच्या राजवटीत लोकांना रामाचे नाव सुद्धा घेता येत नाही एवढंच काय येथील नागरिकांना रामनवमी साजरी करू देत नाही. “टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ममता बॅनर्जीच्या (Mamata Banerjee) सरकारवर केला.
काय म्हणाले होते टीएमसीचे नेते ?
तत्पूर्वी, तृणमूल कॉंग्रेसचे नेते आमदार हुमायून कबीर (Humayun Kabir) यांनी मुर्शिदाबाद येथील प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, हिंदूंना दोन तासांत भागीरथी नदीत बुडवून टाकले जाईल, अन्यथा राजकारण सोडू, हुमायून कबीर हे भरतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. (PM Narendra Modi)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community