महाराष्ट्राचं सध्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लगलेला आहे. मुख्य म्हणजे शरद पवारांनी वसंतदादा पाटीलांची जी अवस्था केली तीच अवस्था उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि उद्दव ठाकरेंच्या माध्यमातून शरद पवारांना झटका दिला.
( हेही वाचा : संजय राऊत आता गप्प बसून काय फरक पडणार आहे? )
दीपक केसरकरांचे वक्तृत्व
या सर्व राजकारणात एक अत्यंत चांगली गोष्ट महाराष्ट्राने अनुभवली, ती म्हणजे दीपक केसरकरांचे वक्तृत्व. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. जेवढे प्रश्न दीपक केसरकरांना या तीन – चार दिवसात विचारले तेवढे प्रश्न उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांत कधी विचारले नव्हते. दीपक केसरकरांनी सर्व प्रश्नांची उत्तरे न डगमगता अत्यंर शांतपणे दिलेली आहेत आणि कोणत्याही प्रश्नापासून पळ काढलेला नाही.
अगदी तुम्ही राहत असलेल्या हॉटेलचा खर्च कोण करतो? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, “हा खर्च आम्ही करु शकत नाही का? आणि जेव्हा उद्धव ठाकरेंनी आम्हाला हॉटेलमध्ये ठेवलं होतं, तेव्हा हाच प्रश्न तुम्ही त्यांना विचारला होता का?” दुसरा कुणी असता तर या प्रश्नावर कदाचित क्लीन बोल्ड झाला असता. पण केसरकरांनी आपल्या अनुभवाने उत्तर दिलं आणि पत्रकाराची बोलती बंद केली.
तर निश्चितंच त्यांची कमी हानी झाली असती
यावरुन महाराष्ट्राला असा प्रश्न पडला आहे की उद्धव ठाकरेंनी हा हीरा कुठे लपवून ठेवला होता? की त्यांना हिर्याची पारखंच नाही. कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या नेतृत्वगुणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की ठाकरेंना माणसं ओळखता येत नाहीत. लोकांना गलिच्छ शिव्या देणारे संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते होते. पण ठाकरेंनी केसरकरांना प्रवक्ता म्हणून नेमलं असतं तर निश्चितंच त्यांची कमी हानी झाली असती.
एकनाथ शिंदेंचं याबाबतीत कौतुक करावं लागेल की त्यांनी योग्य माणसावर योग्य जबाबदारी सोपवली आहे. शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्राने एक चांगला, हुशार आणि सभ्य प्रवक्ता पाहिला.
Join Our WhatsApp Community