विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा आहे कि नाही; Uddhav Thackeray यांनी पराभवाचे खापर भाजपवरच फोडले

117

महाराष्ट्रात महिला, शेतकरी यांच्यामध्ये असंतोष आहे. मोदी, शहा यांच्या सभांतून लोक निघून जात होते. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सरकारने अशी काय कामे केली आहेत की, लोकांनी त्यांना एवढे बहुमत द्यावे ? ज्याप्रमाणे सरकारला एक देश, एक निवडणूक योजना आणायची आहे, त्याप्रमाणे एक पक्षही आणणार, असे आता दिसत आहे. त्यांना आता विधीमंडळात विधेयके संमतीसाठी मांडायचीही गरज राहिलेली नाही. सरकारला विरोधी पक्ष ठेवायचा आहे कि नाही ?, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पराभवाचे खापर भाजपवरच फोडले आहे.

(हेही वाचा – हिंदूंनी एक बोट दाबलं, तर सरकार आलं; वज्रमूठ केली तर हिंदू राष्ट्र निश्चित; Hindu Janajagruti Samiti चे प्रतिपादन)

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर येत गेले, तसे मविआला राज्यातील जनतेने नाकारले असल्याचे स्पष्ट झाले. महायुतीने २३१ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह विरोधी पक्षातील सर्वच नेते ईव्हीएमवर खापर फोडत आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या वेळी मतदारांनाही दोष दिला आहे. ते म्हणाले, “विधानसभेचा निकाल लागला. पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी लागला आहे. कसा लागला हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. पण तरीही जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिकपणे आघाडीला मतदान केलं, त्यांचे आभार मानतो. जणू काही लाटेपेक्षा त्सुनामीच आली असं दिसतं. सर्व सामान्य जनतेला पटला की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा निकाल पाहिला तर मी ज्या काही प्रचार सभा घेतल्या. राज्यभर आम्ही फिरलो. हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मते का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का. कापसाला भाव नाही म्हणून दिली का? राज्यातील उद्योग गुजरातला नेले जात आहे त्यासाठी दिले का. महिलेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली त्यासाठी मते दिली का. कळत नाही,. प्रेमापोटी नाही पण रागापोटी अशी ही लाट जणूकाही उसळली हे कळत नाही. हा निकाल अनाकलनीय आहे. यामागचं गुपित काही दिवसात शोधावं लागणार आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.