Indi Alliance च्या बैठकीला कोणते नेते उपस्थित आणि कोणते अनुपस्थित?

201

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर शनिवार, १ जून रोजी दिल्लीत इंडी आघाडीची (Indi Alliance) काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे . या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काही नेते उपस्थित आहेत. मात्र बरेच नेते अनुपस्थित आहेत.

(हेही वाचा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून धर्मांतर करणाऱ्या पाद्रीने स्वीकारला Hindu Dharm)

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे मात्र या बैठकीला अनुपस्थित आहेत. तसेच उबाठाचे उद्धव ठाकरेही गैरहजर आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीला अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संजय सिंह उपस्थित आहेत. इंडी  आघाडीच्या (Indi Alliance) बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. आघाडीतील घटक पक्ष ७ टप्प्यांमधील कामगिरीचे परीक्षण केले जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.