Shashi Tharoor : केरळचा उदोउदो करण्याच्या नादात शशी थरूर यांचा खोटारडेपणा उघड; नेटकऱ्यांनी केले ट्रोल 

जगातील दुसरे आणि भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून महाराष्ट्रातील महाबळेश्वरमधील 'भिलार' हे गाव ओळख गेले आहे. इंग्लंडमधील 'हे ऑन वे' या गावाच्या धर्तीवर 'भिलार' हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून पुढे आले, असे असताना शशी थरूर यांनी नेहमीप्रमाणे खातरजमा न करता केरळातील गाव पहिले पुस्तकाचे गाव असल्याचा दावा केला आहे.

350

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) सवंग प्रसिद्धीसाठी घाई गडबडीत सोशल मीडियात पोस्ट करतात आणि तोंडघशी पडतात. काही वेळा त्यांनी महत्वाच्या व्यक्तींच्या निधनाची खात्री न करता श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यांच्या या अशा वृत्तीमुळे ते सोशल मीडियात कायम टीकेचे धनी बनतात. आता केरळचा उदोउदो करण्याच्या नादात शशी थरूर (Shashi Tharoor) पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. केरळमध्ये पुस्तकाचे गाव उभारण्यात आले आहे, त्याविषयी माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हे गाव देशातील पहिले पुस्तकाचे गाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वास्तविक महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ६ वर्षांपूर्वीच ‘भिलार’ हे गाव पहिले पुस्तकाचे गाव म्हणून उभारण्यात आले आहे.

‘भिलार’ पहिले पुस्तकाचे गाव असताना थरूर यांचा भलताच दावा  

केरळमध्ये (Shashi Tharoor) सध्या पुस्तकाचे गाव उभारण्यात आले आहे. त्याविषयीची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्याचा संदर्भ देत शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी हा व्हिडीओ एक्स वर व्हायरल केला आहे आणि त्यावर ‘भारताचे पहिले पुस्तकाचे गाव – साहजिकच हे केरळ आहे’, अशी ओळ त्यावर लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रॉल केले करणे सुरु केले आहे. वास्तविक महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथील ‘भिलार’ हे गाव १ मे २०१७ या दिवशी तत्कालीन मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पुस्तकाचे गाव म्हणून घोषित केले होते. हे जगातील दुसरे आणि भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळख गेले आहे. इंग्लंडमधील ‘हे ऑन वे’ या गावाच्या धर्तीवर ‘भिलार’ हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून पुढे आले, असे असताना शशी थरूर यांनी नेहमीप्रमाणे खातरजमा न करता केरळातील गाव पहिले पुस्तकाचे गाव असल्याचा दावा केला आहे.

(हेही वाचा Hindu : अयोध्या, ज्ञानवापीनंतर आता हिंदूंचे आणखी एक श्रद्धास्थान मुसलमानांच्या अतिक्रमणापासून होणार मुक्त; न्यायालयाच्या महत्वाचा निर्णय )

कडकसिंग यांनी त्यांचा पर्दाफाश करताना म्हटले आहे की, महाबळेश्वर येथील “भिलार” हे भारतातील पहिले “पुस्तकाचे गाव” आहे. जे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे सरांच्या कल्पनेचे मुर्त स्वरूप बनले ते ही तब्बल ६ वर्षापूर्वीच !! पण “खोटं बोल पण रेटून बोल” अशी काँग्रेसची सवय असल्याने शशी थरूर  (Shashi Tharoor) कोणतीही शहानिशा न करता बिनधास्त खोटं बोलत आहेत. ही तर “अशिक्षितांची” लक्षणे आहेत.’ ते म्हटले आहे.

पवन साळुंखे म्हणाले की, काय दिवस आलेत तुमच्यावर…येवढ्या वेळेस थोबाडावर पडले पण आमचीच लाल म्हणायची सवय काही गेली नाही.

तर प्रशांत गोसावी यांनी, काँग्रेसचे हे नेहमीचेच भिकार लक्षण आहे, असे म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.