‘येथे औरंगजेब आला तर शिवाजी देखील त्याच्याशी दोन हात करायला उभा ठाकले. इतके या मातीचे वैशिष्ट्य आहे. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची ताकद दाखवून देतात. इंग्रजांच्या काळातदेखील काशीच्या लोकांनी हेस्टिंगचे काय हाल केले होते हे येथील लोकांना माहिती आहे’, असे मोदी काशी विश्वनाथ काॅरीडोअरच्या उद्घाटनाच्या वेळी म्हणाले.
मोदींनी मागितली ही ३ वचने
देशासाठी मला ३ वचनं द्या, असे म्हणत मोदींनी जनतेकडून देशासाठी ३ वचने घेतली. या वचनांमध्ये स्वच्छता, सृजनशीलता आणि आत्मनिर्भर भारतासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या वचनांचा समावेश आहे. विनाश करणाऱ्यांची शक्ती कधीही भारताच्या शक्ती-भक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांना समजून घ्या, अरेरावीकरता राज्य दिले नाही!)
शत्रू राष्ट्रांना दिला इशारा
मोदी पुढे म्हणाले, ‘प्रत्येक भारतीयाच्या हातांमध्ये अकल्पनीय असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची ताकद आहे. आम्हाला तप, तपस्या माहिती आहे. आम्हाला देशासाठी रात्रं-दिवस कष्ट करायचं माहिती आहे. आव्हान कितीही मोठं असेना आम्ही भारतीय ते आव्हान पेलू शकतो. विनाश करणाऱ्यांची शक्ती कधीही भारताच्या शक्ती-भक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही. ज्या दृष्टोकोनातून आपण जगाला पाहतो त्याच दृष्टीकोनातून जग आपल्याला पाहतं हे लक्षात ठेवा.’
महाराजांचा केला उल्लेख
‘अनेक वर्षांच्या गुलामगिरीने आपल्यावर परिणाम केला होता, भारताला हीन भावनेने भरून टाकलं होतं. मात्र, आजचा भारत त्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे. आजचा भारत केवळ सोमनाथ मंदिराचं सौंदर्यीकरणच करत नाही, तर समुद्रात हजारो किलोमीटर ऑप्टिकल फायबर देखील पसरवत आहे. आजचा भारत केदारनाथचा जिर्णोद्धारच करत नाही, तर स्वतःच्या हिमतीवर अंतराळात भारतीयांना पाठवण्याच्या तयारीत आहे. आजचा भारत केवळ अयोद्धेत प्रभु रामांचं मंदिरच बनवत नाही, तर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज देखील बनवत आहे,’ अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे.
Join Our WhatsApp Community