शिवसेनेकडून सर्व ५५ आमदारांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप असल्याची माहिती शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे. दोन आठवडे कोणीही व्हिप बजावू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही व्हिप बजावण्यात आला आहे.
( हेही वाचा : “मराठी भाषा गौरव दिन” : विधानभवनात साहित्याची ज्ञानयात्रा)
शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी माहिती
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या ४० आमदारांची रविवारी बैठक झाली. यावेळी अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा करून व्हिप बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या शिवसेनेकडे ४० आणि ठाकरे गटाकडे १५ असे विधानसभेत ५५ आमदार आहेत. व्हिप म्हणजे पक्षाचा आदेश असतो. हा आदेश पाळल्यास संबंधित आमदारांचे सभागृह सदस्यत्व अर्थात आमदारकी रद्द करण्यात यावी अशी शिफारस पक्षाच्या वतीने केली जाऊ शकते.
दरम्यान, अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप आहे याचा कोणीही भंग केला तर त्याविरोधात कारवाई केली जाणार नाही असे स्पष्टीकरण गोगावले यांनी दिले आहे.
Join Our WhatsApp Community