Shivsena नक्की कुणाची? ४९ मतदारसंघ देणार ‘निकाल’

विधानसभा निवडणुकीत 49 पैकी मतदारसंघांमध्ये मुंबई महानगरातील 19 आणि मुंबईत 12 मतदारसंघांचा समावेश आहे. तर मराठवाडा आणि कोकण इथे प्रत्येकी 8, विदर्भात 6 तर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी 4 मतदारसंघांचा समावेश आहे.

138
शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर उबाठा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन गट पडले. हे दोन्ही गट प्रथमच लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या समोर आले होते. मात्र या निवडणुकीत उबाठाला एक गठ्ठा मुस्लिमांची मते मिळाल्याने उबाठाच्या परड्यात बऱ्यापैकी यश आले. परंतु विधानसभा निवडणुकीत आता विचारधारेवर मतदान होण्याची शक्यता आहे. अशा वेळी मूळ धाटणीची शिवसेना (Shivsena) नक्की कुणाची, हे पाहूनच मतदान होणार आहे. यासाठी राज्यातील 49 मतदारसंघ असे आहेत जिथे दोन्ही गटामध्ये थेट लढत होणार आहे. हे मतदारसंघच शिवसेना (Shivsena) नक्की कुणाची याचा ‘निकाल’ करणार आहे.

कोणते आहेत ‘ते’ मतदारसंघ? 

विधानसभा निवडणुकीत 49 पैकी मतदारसंघांमध्ये मुंबई महानगरातील 19 आणि मुंबईत 12 मतदारसंघांचा समावेश आहे. तर मराठवाडा आणि कोकण इथे प्रत्येकी 8, विदर्भात 6 तर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी 4 मतदारसंघांचा समावेश आहे.

लोकसभेला काय झाले होते?

त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांचा १३ लोकसभा मतदारसंघांत एकमेकांशी सामना झाला. त्यापैकी उबाठाने सात आणि शिंदेंच्या शिवसेनेने सहा जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मुंबईतील तीनपैकी केवळ एका मतदारसंघात विजय मिळविता आला होता. तर, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने (Shivsena) दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईत विजय मिळविला. तसेच उत्तर पूर्व मुंबई लोकसभेत शिंदे गटाने केवळ ४८ मतांनी विजय मिळविला होता.

कोकणातही अटीतटीची लढाई

शिवसेनेसाठी (Shivsena) मुंबई महानगरनंतर कोकण विभाग सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. कोकण प्रदेशातील लोकसभेच्या सर्व म्हणजे पाच जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गमवाव्या लागल्या होत्या. कोकणात यावेळी कुडाळमधील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे शिंदे गटाकडून निवडणुकीला उभे आहेत. तर, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत हे रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघातून अनुक्रमे बाळ माने आणि राजन साळवी यांच्याविरोधात निवडणुकीला उतरले आहेत. तर, सावंतवाडीमध्ये राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राजन तेली निवडणूक लढविणार आहेत. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र इथे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र येथील बरेचसे शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंकडे गेले आणि शिंदेंनीही त्याच विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली, त्यामुळे इथे उबाठाला नव्या चेहऱ्याला घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.