Madhavi Latha यांनी सोडलेला बाण नक्की कोणाला लागला?

290

लेखक – जयेश शत्रुघ्न मेस्त्री

१३ मे रोजी हैदराबादमध्ये निवडणूक होणार आहे. ४० वर्षांनंतर ओवैसी कुटुंबाच्या विरुद्ध एक सक्षम पर्याय भाजपाने दिला आहे. माधवी लता (Madhavi Latha) असं या उमेदवाराचं नाव असून गेली काही वर्षे त्या हैदराबादमध्ये सामाजिक कार्ये करत आहेत. तिथल्या पासमंदा मुस्लिम (मागास मुस्लिम समाज) समाजाची प्रश्न त्यांनी सोडवली आहेत. मोदी सरकारने आणलेल्या ट्रिपल तलाक कायद्याबाबत त्यांनी हैदराबादच्या मुस्लिम महिलांना मार्गदर्शन केले, तेव्हा त्या हैदराबादच्या बाहेर प्रसिद्ध झाल्या. त्याआधी त्यांनी तिथे अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. वैद्यकीय शिबिर ते मोफत धान्य वाटप. पासमंदा मुस्लिम समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्या झटत आहेत.

आता माधवी लता (Madhavi Latha) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात वरवर पाहता त्या प्रचारादरम्यान बाण सोडल्याची कृती करत आहेत आणि मग मोबाईलच्या कॅमेरातून मशीद दिसते, याचा अर्थ त्या मशिदीवर बाण सोडत असल्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील स्वयंघोषित पुरोगाम्यांना एक आयता मुद्दा मिळाला. असदुद्दीन ओवैसी यांनी तर माधवी लता हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की तुम्ही बाण सोडला तरी आम्ही फुलांचा वर्षाव करु.

(हेही वाचा Love Jihad : मुलीला धर्मांधाने ठार केले हा लव्ह जिहादच; कर्नाटकातील पीडित मुलीचे वडील काँग्रेसच्या नगरसेवकाने केले मान्य )

मुस्लिमांनी ओवैसींना मतदान करु नये यासाठी अनेक कारणे

खरंतर माधवी लता (Madhavi Latha) यांनी स्पष्टीकरण देऊन सांगितलं की “त्या दिवशी रामनवमी होती आणि मी रामाची मुद्रा सादर केली. माझा हात मशिदीकडे वळलाच नव्हता पण व्हिडिओ काढणार्‍याने मुद्दामून धार्मिक रंग देण्यासाठी तसे केले.” ओवैसी निवडणुकीदरम्यान पहिल्यांदा इतके बिथरलेले आहेत. हैदराबाद मतदारसंघात ४०% हून अधिक मुस्लिम जनता आहे. मुस्लिम मते ही त्यांची ताकद आहे. मुस्लिमांनी त्यांना मतदान का करावं? यासाठी एकच कारण आहे, तो म्हणजे ओवैसी हे मुस्लिम आहेत आणि जी कट्टरता त्या समाजाला अपेक्षित आहे, ती कट्टारता प्रदान करण्यात ओवैसी सिद्ध आहेत. मात्र मुस्लिमांनी ओवैसींना मतदान करु नये यासाठी अनेक कारणे आहेत. अशिक्षितपणा, बेरोजगारी, अविकसित, कट्टरतेच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करणं, तिथल्या मुस्लिम मुलींची पैशांसाठी होणारी विक्री (तसा आरोप माधवी लता यांनी केला आहे.) इत्यादी…

मुस्लिम समाजाला मूळ प्रवाहात येण्यापासून रोखले 

कॉंग्रेस, ओवैसींसारखे भ्रष्ट मुस्लिम नेते आणि एकंदर सेक्युलर विश्वाने मुस्लिम समाजाला मूळ प्रवाहात येण्यापासून रोखून ठेवले. हेच धोरण ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये राबवले आहे. मुस्लिम समाजाला जितके मागास ठेवाल, तितके ते कट्टर होतील आणि भितीपोटी या भ्रष्ट नेत्यांना मतदान करत राहतील. हे धोरण कॉंग्रेसने सुरु केले आणि इतर भ्रष्ट पक्षांनी व नेत्यांनी स्वीकारले. २०१४ पूर्वी हे धोरण यशस्वी ठरत होते. मात्र मोदी आल्यानंतर मुस्लिम समाजाला वाटू लागलं की “लगता हैं, कौनो फिरकी ले रहा हैं.” हळूहळू मुस्लिमांची मते भाजपाला मिळू लागली, विशेषतः मुस्लिम भगिनींची. त्यामुळे बिथरलेल्या कॉंग्रेसने व इतर पक्षाने मुस्लिमांना एनआरसी, सीएए विरुद्ध भडकवून आंदोलनाच्या नावाखाली दंगली घडवून आणल्या. पण पासमंद मुस्लिम समाज ही चळवळ हळूहळू उभी राहू लागली आणि भाजपाने या समाजाच्या कल्याणाचा विडा उचलला. त्यामुळे राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि ओवैसींसारख्या वैचारिक भ्रष्टाचार्‍यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली.

(हेही वाचा Pandav Wada : पांडववाड्यात अतिक्रमण केलेल्या मशिदीच्या चाव्या नगरपरिषदेत द्या; हिंदूंना प्रवेश द्या; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)

ओवैसी व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत 

हैदराबादच्या निवडणुकीत आपण पराभवाच्या सीमेजवळ पोहोचलो आहोत, हे लक्षात घेऊन ओवैसी हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरी मुस्लिम पुरुष या षडयंत्राला बळी पडले तरी स्त्रिया बळी पडणार नाहीत. कारण मोदींनी मुस्लिम माता-भगिनींचे अश्रू पुसले आहेत. माधवी लता (Madhavi Latha) त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी झटत आहेत. जे ओवैसींना नकोय. कारण मुस्लिम मूळ प्रवाहात आले तर त्यांची वोट बॅंक संपुष्टात येईल. म्हणूनच माधवी लता (Madhavi Latha) यांनी मारलेला बाण त्यांनी स्वतःवर घेतला आहे. आपण घायाळ झालो आहोत असं दाखवत ओवैसी व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. पण आता बाण स्वतःवर घेतलाच आहे, तर विजयाचे पेढे भरवून माधवी लता शुश्रूषा करायला नक्कीच येतील.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.