छत्तीसगडच्या निवडणूक (Chhattisgarh Election 2023) निकालाने सर्वांनाच धक्का बसला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस अत्यंत मजबूत मानली जात होती; परंतु भाजपने छत्तीसगडमधून भूपेश बघेल (Bhupesh Baghel) सरकार उलथून टाकून मोठी उलथापालथ केली आहे. भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आहेत. येथे ईश्वर साहू (Ishwar Sahu) यांनीही मोठा बदल घडवला आहे.
(हेही वाचा – Accident : हिमाचल मध्ये भीषण अपघात,सहा जणांचा मृत्यू सहा जखमी)
छत्तीसगडमध्ये अशाच प्रकारचा धक्कादायक निकाल राज्याच्या बेमेतरा जिल्ह्यातील साजा विधानसभा मतदारसंघात दिसून आला. येथे एक मजूर ईश्वर साहू (Ishwar Sahu) याने भूपेश बघेल सरकारचे कृषीमंत्री रवींद्र चौबे यांचा पराभव केला आहे. रवींद्र चौबे (Ravindra Chaubey) यापूर्वी या मतदारसंघातून सात वेळा निवडून आले आहेत. याउलट ईश्वर साहू यांनी या निवडणुकीपूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या यंदाच्या विजयाला मोठे महत्त्व आले आहे.
He is Eshwar Sahu, a labour, now a BJP MLA in Chattisgarh. We fielded him, after his son was killed by a Muslim mob, and the Congress chose to side with the murderers. Today, he defeated Ravindra Choubey, a 7 time Congress MLA!
He won’t get his son back but some closure perhaps… pic.twitter.com/NqpENwRBED— Amit Malviya (@amitmalviya) December 3, 2023
विद्यमान मंत्र्यांचा ५ हजार मतांनी पराभव
ईश्वर साहू यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांनी 5 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. ईश्वर यांना 1 लाख 1 हजार 789 मते मिळाली, तर चौबे (Ravindra Chaubey) यांना 96 हजार 593 मते मिळाली. दोघांमध्ये 5196 मतांचा फरक आहे.
दंगलीत मुलगा वारल्यानंतर भाजपने दिली संधी
निवडणुकीदरम्यान बेमेतरा आणि कवर्धा येथे झालेला जातीय हिंसाचार आणि धर्मांतरांच्या मुद्द्यावर भाजपने काँग्रेसवर (congress) निशाणा साधला. या वेळी भाजपने रायपूरपासून 110 किमी अंतरावर असलेल्या बिरनपूर येथे राहणाऱ्या ईश्वर साहू या पेशाने मजूर असलेल्या व्यक्तीला तिकीट दिले होते. ईश्वर साहू यांनी आतापर्यंत सरपंचपदाचीही निवडणूक लढलेली नाही. असे असूनही भाजपच्या अपेक्षा पूर्ण करून ईश्वर साहू यांनी रवींद्र चौबे यांच्यासारख्या प्रस्थापिताला पराभूत केले. ईश्वर साहू हे केवळ उमेदवार नसून ‘न्यायासाठीच्या लढ्याचे प्रतीक’ असल्याचे अमित शहा (Amit Shah) यांनी साजामधील प्रचारादरम्यान म्हटले होते.
किरकोळ मारहाणीचे दंगलीत रूपांतर
साजा येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले ईश्वर साहू यांचा मुलगा एप्रिल 2023 मध्ये साजा विधानसभा मतदारसंघातील जातीय दंगलीत मारला गेला. येथील स्थानिक शाळेत झालेल्या किरकोळ मारहाणीच्या घटनेचे नंतर जातीय दंगलीत रूपांतर झाले होते. या दंगलीत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ईश्वर साहू यांचा मुलगा भुवनेश्वर याचाही समावेश होता. सराकरने ईश्वर साहू (Ishwar Sahu) यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती; परंतु ईश्वर साहू यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला होता.
लोकशाहीच्या लढाईत झालेल्या अन्यायाचा सूड – बी.एल. संतोष
He is Sri Eshwar Sahu . @BJP4CGState candidate . He defeated 7 time @INCIndia MLA Sri Ravindra Choubey . His son was killed in a mob violence & as usual Cong was supportive of rioters . Today he avenged injustice in a Democratic battle . Congratulations . pic.twitter.com/JnRb9Jf3gz
— B L Santhosh (@blsanthosh) December 3, 2023
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष यांनी ट्विट केले की, ‘हे ईश्वर साहू आहेत. छत्तीसगडमधून भाजपचे उमेदवार त्यांनी काँग्रेसचे 7 वेळा आमदार राहिलेले रवींद्र चौबे यांचा पराभव केला. जमावाने केलेल्या हिंसाचारात त्यांचा मुलगा मारला गेला आणि काँग्रेसने नेहमीप्रमाणे दंगलखोरांना पाठिंबा दिला. आज त्यांनी लोकशाहीच्या लढाईत झालेल्या अन्यायाचा सूड घेतला. अभिनंदन ! (Ishwar Sahu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community