मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याला कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत कोण?

171

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमागे विविध केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा सुरू असताना ही कारवाई आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली आहे. ईडीने चक्क मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याला चौकशीच्या फे-यात अडकवले आहे. यात पुष्पक ग्रुपच्या ६ कोटी ४५ रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका सील केल्या. श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी हे मात्र दोन डझनहून अधिक कंपन्यांचे संचालक असल्याचे समोर आले आहे.

कोण आहेत नंदकिशोर चतुर्वेदी?

  • नंदकिशोर चतुर्वेदी संचालक असलेल्या बहुतेक कंपन्या शेल कंपन्या असल्याचा संशय
  • मुंबईतील एकाच पत्त्यावर चतुर्वेदीच्या १९ कंपन्या रजिस्टर्ड
  • चतुर्वेदी पेशाने सीए आहेत, मात्र कोणतीही सीए फर्म चालवत नाहीत
  • चतुर्वेदींच्या एकाच पत्त्यावर दहापेक्षा अधिक शेल कंपन्यांची नोंदणी
  • मुंबई, कोलकाता आणि दिल्लीमध्ये विविध ठिकाणी शेल कंपन्यांची स्थापना
  • या शेल कंपन्यांच्या माध्यमातून १५ ते २० वर्षांपासून काळा पैसा पांढरा करण्याचे काम सुरू
  • चतुर्वेदी यांच्या बीकेसीतील एका भूखंडाच्या व्यवहाराची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू
  • मार्च २०२१ पासून ईडी आणि आयकर विभागाकडून चतुर्वेदी यांची चौकशी सुरु
  • चतुर्वेदी मे २०२१ पासून आफ्रिकेच्या एका देशात वास्तव्यास आहे
  • नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर हे दोघे एकमेकांना २००९ सालापासून ओळखतात

(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर काय आहेत आरोप?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.