कोण आहेत Nidhi Tiwari ? कशा बनल्या पंतप्रधानांच्या खासगी सचिव ?

118

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी (Nidhi Tiwari) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निधी तिवारी (Nidhi Tewari) या २०१४ मध्ये Indian Foreign Service मध्ये भरती झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विविध आणि महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. (PM private secretary)

(हेही वाचा – Sambhaji Nagar च्या उपजिल्हाधिकाऱ्याना जीवे मारण्याचा कट रचणारा निघाला मनोज जरांगेंशी संबंधित)

निधी तिवारी या 2024 च्या आयएफएस बॅचच्या अधिकारी आहेत. DoPT कडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, निधी तिवारी या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत होत्या. आता त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. IFS निधी तिवारी यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान कार्यालयात (PMO) उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी, त्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात (MEA) निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांच्या विभागात सचिव म्हणून काम करत होत्या.

यूपीएसी परीक्षेत ९६ वा क्रमांक

निधी तिवारी यांनी २०१३ च्या यूपीएससी परीक्षेत केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ९६ वा क्रमांक मिळवला होता. पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवल्यामुळे, तिला भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) मिळाली. निधीची पहिली पसंती IFS होती, त्यानंतर तिने IAS आणि IPS होण्याचा मार्ग निवडला होता. IFS मध्ये सामील झाल्यानंतर निधी तिवारी यांनी परराष्ट्र मंत्रालयात आपली सेवा सुरू केली. तेथे त्यांनी निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांमध्ये सचिव म्हणून काम केले आहे. (Nidhi Tiwari)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.