महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आले. तर त्यांनी शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकरांना १६४ तर राजन साळवींना १०७ मतं मिळाली. रईस शेख, अबू आझमी आणि फारूख अन्वर या तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरत होती. विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेले राहुल नार्वेकर कोण आहेत… जाणून घ्या…
(हेही वाचा – Maharashtra Assembly session: महाराष्ट्राने नवा रेकॉर्ड केला, फडणवीसांकडून नार्वेकरांचं कौतुक)
- राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरूण अध्यक्ष म्हणून निवडले गेले असल्याने सध्या देशभरात त्यांचीच चर्चा आहे.
- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेले भाजपचे राहुल नार्वेकर हे राजकीय घराण्यातील आहेत.
- राहुल नार्वेकरांनी शिवसेनेतून आपल्या राजकारणाची सुरूवात केली. १५ वर्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेत काम केले. त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक आहेत.
- आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर हे खास मित्र होते. २०१४ साली राहुल नार्वेकर यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
- राष्ट्रवादीकडून २०१४ ची लोकसभा निवडणूक नार्वेकरांनी मावळ येथून लढवली. यावेळी शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून त्यांचा पराभव झाला.
- राष्ट्रवादी सोडून २०१९ साली नार्वेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी भाजपने कुलाबा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली.
- मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या आणि लक्षवेधी कुलाबा मतदारसंघातून ते आमदार झाले.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राहुल नार्वेकर हे अत्यंत जवळचे मानले जातात.
- नार्वेकर हे राजकारणात सक्रिय असून ते वकील सुद्धा आहेत.
- विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे राहुल नार्वेकर हे जावाई आहेत.