आतापासूनच सोलापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवरून पसंती आणि नापसंती सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच विधान केले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे की राष्ट्रवादीकडे याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे रोहित पवार म्हणाले होते. तेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शाब्दिक वार सुरू झाले. आता रोहित पवारांच्या विधानावर बोलताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी खिल्ली उडवली आहे.
प्रसार माध्यमांसोबत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ‘कोण रोहित पवार? मला माहित नाही. पण हा त्यांचा पहिला टर्म आहे. पोरकटपणा काही जणांमध्ये असतो. थोडा दिवस द्या त्यांना, म्हणजे मॅच्युरिटी येईल.’
दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत हॅट्रिक मारणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी काँग्रेस पक्षातून तीव्र विरोध होत आहे. यावेळेची लोकसभा निवडणुक काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच लढवावी, याची अधिक मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या प्रणिती शिंदेंना भाजपात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होत आहे. पण लोकसभेची निवडणुक लढण्यासाठी खरंच प्रणिती शिंदे हातात कमळ घेणार का? हे येत्या काळातच समजेल.
(हेही वाचा – पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या १८, १९ फेब्रुवारीला थेट मैदानात उतरणार अमित शाह?)
Join Our WhatsApp Community