मविआचा मुख्यमंत्री कोण? Sharad Pawar यांच्या उत्तराने पाडापाडीचे राजकारण होणार 

विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. तशी माझ्या पक्षाची भूमिका आहे, असे शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

163

विधानसभा निवडणुकीच्या आधी मविआमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, असा उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरला होता, जर ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवले तर पाडापाडीचे राजकारण होईल, अशी भीती व्यक्त केली होती. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आणि काँग्रेस यांनी यावर काही भाष्य केले नाही, आता मतदानाला १० दिवस बाकी असतानाच शरद पवारांनी (Sharad Pawar)  ‘ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री होणार’, असे जाहीर केले. त्यामुळे मविआमध्ये पाडापाडीचे राजकारण होण्याची उद्धव ठाकरे यांची भीती खरी ठरणार, अशी शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. तशी माझ्या पक्षाची भूमिका आहे, असे शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी घेतलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न त्यांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी हे उत्तर दिले.

(हेही वाचा Muslim : मुस्लिम मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाच्या दिवशी निकाह न लावण्याचा काझीचा निर्णय)

उबाठा काय भूमिका घेणार? 

राज्यात ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. महाविकास आघाडीचा जो कोणीही उमेदवार असो, त्याच्या पाठीशी आपण राहू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली होती.

काँग्रेस-ठाकरेंची मुख्यमंत्रिपदावर वेगवेगळी भूमिका

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसमधील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती. पण असे केल्यास मित्रपक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते, असे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यावर राष्ट्रवादीकडून मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट होत नव्हती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.